ANS Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी देशात 07 टप्प्यात निवडणुका पार पडले आहे. 4 जून रोजी देशात कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण जगाचा लक्ष लागू आहे. 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा संपताच विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहे.
या एक्झिट पोल नुसार पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे तर इंडिया आघाडीला दीडशे पेक्षा कमी जागा मिळणार असल्याचे संकेत या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे आणखीन एक एक्झिट पोल समोर आला आहे ज्यामुळे इंडिया आघाडीला दिलासा मिळू शकतो.
अग्नि मीडिया सर्विसेस या संस्थेने केलेल्या एक्झिट पोल नुसार देशात यावेळी त्रिशंकू स्थिती निर्माण होणार असून सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसणार आहे. या एक्झिट पोल नुसार यावेळी भाजपला 242 तर इंडिया आघाडीला 264 आणि अन्य पक्षांना 37 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अग्नि मीडिया सर्विसेसच्या या एक्झिट पोलनंतर आता 4 जून रोजी भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार की इंडिया आघाडी भाजपला धक्का देत मोठा उलटफेर करणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे ABP-CVoter ने जाहीर केलेल्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
या एक्झिट पोल नुसार राज्यात महाविकास आघाडीला 23 ते 25 आणि महायुतीला 22 ते 26 मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महायुतीमध्ये भाजपला 17 शिंदे गटाला 06 आणि अजित पवार गटाला 01 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला 09 काँग्रेसला 08 आणि शरद पवार गटाला 06 जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलने दिला आहे.