AC side effects : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. विशेष म्हणजे दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. वाढत्या उन्हापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न कराताना दिसत आहे. अनेकजण या दिवसात एसीचा वापर करतात. जर तुम्हीही या दिवसात रात्रभर एसी चालू ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुमचे नुकसान झालेच समजा.
निर्माण होतात श्वसनाच्या समस्या
एसी चालू ठेवून खोलीत झोपले तर श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, विशेषत: ज्यांना आधीच अस्थमा किंवा ऍलर्जी सारख्या समस्या आहेत, त्यांना धोका आहे. यामुळे खोकला, घरघर, छातीत घट्टपणा आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे दिसायला सुरुवात होते.
डोळे होतात कोरडे
खोलीत एसी चालू ठेवून झोपले तर आर्द्रता कमी झाल्यामुळे डोळे कोरडे होऊ शकतात. कोरड्या हवेच्या दीर्घकाळ संपर्कामुळे डोळ्यांना जळजळ आणि अस्वस्थता येते. इतकेच नाही तर यामुळे लालसरपणा, खाज सुटणे आणि अंधुक दृष्टी यासारखी लक्षणे वाढू शकतात.
रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत
थंड हवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते आणि एखाद्या व्यक्तीला व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गास अधिक संवेदनाक्षम बनवते.
तापमान करा मध्यम पातळीवर सेट
एअर कंडिशनरचे तापमान मध्यम पातळीवर सेट करा. हवेमध्ये आर्द्रता जोडण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा आणि ऍलर्जी आणि प्रदूषक कमी करण्यासाठी एअर फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा किंवा बदलणे खूप गरजेचे आहे.
शरीरातून ओलावा नाहीसा होतो
पण तुम्ही एसीमध्ये जास्त वेळ राहिला तर तुमच्या शरीरातून ओलावा नाहीसा होऊ शकतो. असे झाले तर त्वचा कोरडी होते आणि शरीरात पाणी कमी झाल्यामुळे चक्कर येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.