मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यामुळे राज्यभरातून टीका केली जात आहे. असे असताना सत्तार यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही, असे सत्तार म्हणाले आहेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
“मी फक्त खोक्यांबद्दल बोललो. मात्र माझ्या या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. माझ्या वक्तव्याचा संबंध महिलांशी जोडला जात आहे. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. यापुढेही बोलणार नाही. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात. मी ही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे,” असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.
अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त केला जात असून खासदार श्रीकांत शिंदेनी सावरासावर करत प्रतिक्रिया दिली आहे. “अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा बोलण्याचा उद्देश तो नव्हता,” असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहे.
must read
- संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ
- क्रिप्टोकरन्सीला सोन्याचे दिवस, बिटकाॅईनमध्ये पुन्हा तेजी, इथेरियमने खाल्लाय भाव..!