Aaditya Thackeray । आदित्य ठाकरेंची सरकारकडे अजब मागणी, राज्याचे वातावरण पेटणार?

Aaditya Thackeray । राजकीय वर्तुळात सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत असतात. यामुळे अनेकदा राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच पेटत असते.

“आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि खोके सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. जेव्हा या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर झाला, त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की या अर्थसंकल्पात मुंबईसाठी तसेच महाराष्ट्रासाठी काय मिळाले? एकंदरीतच गाजर बजेट पाहायला मिळत असून मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर किंवा इतर शहरांना या बजेटमधून काहीही मिळालं नाही,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

“बहुमजली झोपडपट्ट्या आहेत. अनेक ठिकाणी G+1, G+2 अशा झोपडपट्ट्या पाहायला मिळत असून त्यांना पात्रता यादीत घेण्यात यावं. त्यांना पात्र करुन ही घर दिली जावीत. मी आज मिंधे सरकारला खोके सरकारला चॅलेंज करतो की हिंमत असल्यास मुंबईसाठी, आमच्यासाठी ही मागणी मान्य करा. बहुमजली एसआरएदेखील मान्य करा, कारण ती मुंबईकरांची गरज आहे. जर आमचं सरकार आलं तर आम्ही हे करु,” अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.

यावर्षी अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवनवीन घोषणा केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण , शेतकऱ्यांना मोफत वीज, विद्यार्थ्यांना विद्यावेतन, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, ७ लाख लखपती दिदींसाठी, यांसह अनेक नवनवीन योजनांची घोषणा केली आहे. पण या अर्थसंकल्पात राज्याला काहीही मिळत नाही, असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Leave a Comment