Aadhaar Update : शेवटची संधी! येथे करता येणार 14 जूनपर्यंत आधार कार्ड अपडेट, कसे ते जाणून घ्या…

Aadhaar Update : जर तुम्ही अजूनही आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही आता मोफत आधार कार्ड अपडेट करू शकता. तुम्हाला 14 जूनपर्यंत आधार कार्ड अपडेट करता येईल.

14 जूनपर्यंत करता येणार मोफत आधार अपडेट

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा 14 जून 2024 पर्यंत असून UIDAI कडून आधार अपडेट करण्यासाठी, तुम्हाला ऑनलाइन प्रक्रिया फॉलो करावी लागणार आहे. मागील महिन्यात देखील UIDAI ने माहिती दिली होती की आधार मध्ये कोणताही बदल किंवा नाव, पत्ता, DOB सारखी माहिती अपडेट करणे मोफत करता येईल. तुम्हालाही आधार अपडेट करायचा असेल, तर पुढील पद्धत फॉलो करा.

UIDAI द्वारे ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. myAadhaar पोर्टलच्या मदतीने तुम्हाला तुमचा पत्ता, नाव किंवा जन्मतारीख मोफत बदलता येईल.

असे करा आधार कार्ड अपडेट

 • सर्वात अगोदर माय आधार पोर्टलवर जा.
 • वेबसाइटवर आधार लिंक केलेला फोन नंबर टाका.
 • या ठिकाणी फोन नंबर आणि OTP टाकून लॉग इन करा.
 • या ठिकाणी तुम्हाला नाव, पत्ता, डीओबी अपडेट करणे असे पर्याय पाहायला मिळतील.
 • तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्या माहितीवर क्लिक करावे लागेल.
 • संबंधित कागदपत्रे सादर करून पुढे जा, आधार अपडेट होईल.

मोफत आधार फोटो मोफत अपडेट होतो का?

आधार कार्डचा फोटो बदलायचा असेल किंवा अपडेट करायचा असल्यास हे लक्षात घ्या की ही सुविधा मोफत नाही किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध नाही. आधार फोटो बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी, तुम्ही फॉर्म ऑनलाइन डाउनलोड करावा लागेल. परंतु नंतर तुम्हाला ऑफलाइन मोडवर स्विच करावे लागेल.

असा बदल आधार फोटो

आधार कार्डचा फोटो बदलण्यासाठी तुम्हाला डाउनलोड केलेला फॉर्म भरावालागणार आहे. हा फॉर्म जवळच्या आधार केंद्रावर जमा करावा लागणार आहे. फॉर्म सबमिट करताना तुम्हाला तुमची बायोमेट्रिक माहिती पुन्हा द्यावी लागणार आहे. नवीन छायाचित्रही क्लिक करावे लागेल. तुम्हाला 100 रुपये शुल्क भरून तुमचा आधार फोटो अपडेट करता येईल.

असे डाउनलोड करा फोटोसह अपडेट केलेले आधार कार्ड

 • सर्वात अगोदर My Aadhaar पोर्टलवर जाऊन लॉगिन करा.
 • येथे तुम्हाला “Download Aadhaar” चा पर्याय पाहायला मिळेल.
 • पुढे या पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
 • कॅप्चा कोड प्रविष्ट करून लिंक केलेल्या मोबाइल फोन नंबरवर प्राप्त झालेला OTP टाका.
 • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, Verify & Download वर क्लिक करणे गरजेचे आहे.
 • अशा प्रकारे तुम्ही फोटोसह अपडेट केलेले आधार कार्ड सहज डाउनलोड होईल.

Leave a Comment