Aadhaar Card: देशातील नागरिकांसाठी आज सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड. सरकारी कामासाठी किंवा इतर कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
यामुळे आज काही ऑपरेटर आवश्यक कागदपत्रे नसतानाही आधार तयार करत आहेत. म्हणुन आता UIDAI कठोरता दाखवत कठोर पावले उचलत आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मंगळवारी अधिकृत निवेदनात माहिती दिली की, 1.2 टक्के आधार ऑपरेटर्सना गेल्या वर्षभरात फसवणूक केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. सोबतच अशा प्रकरणांमध्ये आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सरकारच्या मते, हे पाऊल ‘आधार 2.O’ रोडमॅपचा भाग आहे.
एक लाख ऑपरेटर्स असण्याचा अंदाज आहे
ऑपरेटर्सच्या यादीबद्दल बोलायचे तर, भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने अंदाजे एक लाख ऑपरेटर्सची नावे आहेत. हे ऑपरेटर व्यक्तींची नावनोंदणी, त्यांच्या नावात सुधारणा, पत्ता बदलणे आणि फोटो अपडेट यासारख्या आधार सेवा देतात.
कठोर पावले उचलली आहेत
UIDAI नुसार, ऑपरेटरने UIDAI डेटा सेंटरमध्ये नावनोंदणी मशीन आणि इतर उपकरणे नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. ऑपरेटरला दररोज मर्यादित संख्येत नोंदणी करण्याची परवानगी आहे. शिवाय, ऑपरेटर्सना प्रणालीचा गैरवापर करण्यापासून रोखण्यासाठी, नोंदणी यंत्रांना जीपीएस बसविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, भारतात दर महिन्याला सरासरी 200 कोटींहून अधिक आधार प्रमाणीकरण केले जात आहे. या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या 1670 समाज कल्याण (DBT) आणि सुशासन योजना अधिसूचित करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ आधार प्रमाणीकरणाद्वारेच या योजनांचा लाभ घेता येईल.