Kuwait Fire News: मोठी बातमी! कुवेतहून 45 भारतीयांचे पार्थिव घेऊन विशेष विमान केरळमध्ये दाखल; पहा व्हिडिओ

Kuwait Fire News: काल (13 जून) कुवेतमधील मंगफ परिसरातील एका इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे पार्थिव घेऊन भारतीय हवाई दलाचे एक विशेष विमान कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहे.

या वेळी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते. मृतांमध्ये बहुतांश केरळमधील नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय सात मृतांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी तीन, ओडिशातील दोन आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि हरियाणामधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

इमारतीमध्ये उपस्थित असलेल्या 176 भारतीय कामगारांपैकी 45 जणांचा मृत्यू झाला असून 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि उर्वरित सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सर्व रुग्ण सुरक्षित आहेत आणि त्यांच्या वैद्यकीय स्थितीनुसार त्यांना हळूहळू डिस्चार्ज देण्यात येईल.

परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह गुरुवारी कुवेतला पोहोचले होते त्यांनी प्रथम गृहमंत्री शेख फहाद युसूफ सौद अल-सबाह यांची भेट घेतली, ज्यांनी पार्थिवांचे लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी आणि रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व लोकांना योग्य वैद्यकीय सेवेसाठी पूर्ण पाठिंबा आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. मंत्र्यांनी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या आणि आरोग्य मंत्री अहमद अब्देलवाहाब अहमद अल-अवादी यांचीही भेट घेतली.

Leave a Comment