नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यावर चलनातून हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्या. त्यानंतर हजार रुपयाची नोट बंद झाली. पाचशे रुपयांच्या नोटेसह 10,20, 50, 100, आणि 200 रुपयांची नवी नोट चलनात आली. मात्र, या रंगी-बेरंगी नोटांचा आकार नि दर्जाबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. ही नोट जास्त दिवस टिकत नसल्याचाही आरोप होत होता. अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याची दखल घेतली. आता अशी नोट चलनात येणार आहे, की कशीही वापरा.. ना ही नोट फाटेल, ना तुटेल.. भीजण्याचाही प्रश्न राहणार नाही..
आता लवकरच तुमच्या खिशात 100 रुपयांची झगमगती नोट दिसण्याची शक्यता आहे. ‘आरबीआय’ आता ‘वॉर्निश’ लावलेल्या 100 रुपयांच्या नोटा चलनात आणणार आहे. ही नोट फाटणार नाही, ना कापू शकेल.. पाण्यातही भिजणारही नाही.
‘वॉर्निश’ लावलेल्या नोटा चलनात आणण्यामागे त्या अधिक टिकाऊ आणि सुरक्षित बनवणे हा हेतू आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर हळूहळू ‘वॉर्निश’ लावलेल्या नोटाच चलनात आणल्या जातील आणि जुन्या नोटा व्यवहारातून हळूहळू बंद करण्यात येणार, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवालात दिली आहे.
गतवर्षी वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली होती. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला 100 रुपयांच्या ‘वॉर्निश’ लावलेल्या एक अब्ज नोटा छापण्यास मान्यता दिली आहे.
सध्या चलनात असलेल्या नोटा या लवकर खराब होतात. पण या नव्या नोटा कशाही वापरल्या, तरी त्या खराब होणार नाहीत. अनेक वेळा मोडून चुरगळल्यावरही या नोटा फाटणार किंवा कापणार नाहीत. तसेच वॉर्निश पेंट केलेला असल्याने त्या पाण्यात भिजणार नाहीत.
नव्या नोटा सुमारे साडेसात वर्षे टिकतील
सध्या चलनात जांभळ्या रंगाच्या 100 रुपयांच्या नोटा आहेत. नव्या नोटांची डिझाईन आणि आकार आताच्या नोटेप्रमाणेच असेल. मात्र, त्या सध्याच्या नोटांपेक्षा दुप्पट टिकाऊ असतील. सध्याच्या 100 रुपयांच्या नोटेचा सरासरी कालावधी अडीच ते तीन वर्षांचा आहे. मात्र, या नव्या नोटा सुमारे साडेसात वर्षे टिकतील, अशा दावा करण्यात येत आहे. ‘आरबीआय’ अशा एक अब्ज नोटा छापणार आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.