उसाची शेती म्हणजे किमान एफआरपी मिळण्याची शाश्वती. त्यामुळेच जास्त पाणी लागत असूनही उसाचे शेतीमधील महत्व काही केल्या कमी झालेले नाही. मात्र, यंदा त्याच उसाच्या शेतीवर चालणाऱ्या साखर कारखान्यांना वेगळी चिंता सतावत आहे. ती आहे साखर उतारा डाऊन झाल्याची.
साखर कारखान्यातील उसाचा उतारा ‘डाऊन’ झाल्याने सर्व कारखानदार चिंतित आहेत. कारण यामुळे साखरचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळेच साखरेचा उतारा कमी होण्याच्या कारणांवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन सुरू आहे. त्याचे निष्कर्ष आल्यावरच खऱ्या अर्थाने याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
याबाबत दिव्य मराठी वृत्तपत्राशी बोलताना दिगंबर बडदे (महाव्यवस्थापक, संभाजी शुगर) यांनी म्हटले आहे की, यावर्षी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. ऊस जास्त असल्याने उसाचे गाळप व्हावे म्हणून नोव्हेंबरमध्येच पाऊस सुरू असताना गाळपास प्रारंभ करावा लागला. त्यामुळे उसाचे पाणी तुटले नाही. कारखान्याला ऊस आणण्यापूर्वी किमान तीन आठवडे आधी पाणी तोडावे लागते. यावर्षी तसे झाले नाही. याचाच परिणाम साखर उताऱ्यावर झाला असावा.
साखर उतारा सर्वात जास्त म्हणजे ११.३७ टक्के कोल्हापूर विभागाचा आहे. तर, सर्वात कमी उतारा अमरावती विभागाचा (८.४८ टक्के) आहे. राज्यात सर्वात जास्त म्हणजे १३ सहकारी आणि २७ खासगी असे ४० साखर कारखाने सोलापूर विभागात गाळप करत असून तेथील साखर उतारा ८.९५ टक्के आहे. तो कारखानदारांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारा आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : [email protected]
- Bike Servicing Tips : दुचाकीचे आरोग्य जपा; ‘या’ पद्धतीने घरच्या घरीच घ्या काळजी
- Immunity Booster : इम्युनिटी स्ट्राँग करण्यासाठी ‘हे’ फूड आहेत जबरदस्त; आहारात समावेश कराच
- World Alzheimer’s Day 2023 : लक्षातच राहत नाही ना.. नो टेन्शन, ‘हे’ फूड खा अन् डोकं चालवा भन्नाट
- WhatsApp Update : व्हॉट्सअॅपने आणलेत 3 खास फीचर्स; आता ‘ही’ कामे होतील पटकन
- Jio Air Fiber चा Airtel ला धक्का! पहा, किंमत आणि फीचर्समध्ये कोण आहे बेस्ट?