दिल्ली :
सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. अशावेळी बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात वेगाने पाय पसरत आहेत. त्याच कंपन्यांकडून देशातील ग्राहक आणि व्यावसायिकांची फसवणूक होत आहे. एकूणच त्या कंपन्या दिवसाढवळ्या दरोडा टाकीत असल्याचा आरोप कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केला आहे.
त्यांनी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून अशा सर्व ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्वीगीसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकत टाकताना उत्पादनांची पूर्ण माहिती न देता लीगल मॅट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटी) कायदा-२०११ आणि एफएसएसएआयच्या निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे.
पोर्टलवर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर त्याबाबत सर्व माहिती टाकणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. तसेच या वस्तू किती दिवसांपर्यंत वापरण्यायोग्य आहेत, हे पण सांगणे अावश्यक आहे. हेच या कंपन्या अजिबात करीत नसल्याचे पत्रात म्हटले आहे. कॅटचे राष्ट्रीय सचिव बी.सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी असे पत्र पाठवल्याचे म्हटले आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : [email protected]
- Bike Servicing Tips : दुचाकीचे आरोग्य जपा; ‘या’ पद्धतीने घरच्या घरीच घ्या काळजी
- Immunity Booster : इम्युनिटी स्ट्राँग करण्यासाठी ‘हे’ फूड आहेत जबरदस्त; आहारात समावेश कराच
- World Alzheimer’s Day 2023 : लक्षातच राहत नाही ना.. नो टेन्शन, ‘हे’ फूड खा अन् डोकं चालवा भन्नाट
- WhatsApp Update : व्हॉट्सअॅपने आणलेत 3 खास फीचर्स; आता ‘ही’ कामे होतील पटकन
- Jio Air Fiber चा Airtel ला धक्का! पहा, किंमत आणि फीचर्समध्ये कोण आहे बेस्ट?