दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) 12 देशांमध्ये किमान 92 मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूंच्या उपस्थितीची खात्री केली आहे. येत्या काळात हा विषाणू जगभरात पसरू शकतो, असा इशाराही WHO ने दिला आहे. माहितीनुसार, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, इटली आणि स्वीडनमध्ये मंकीपॉक्स विषाणूचे संक्रमण झाल्याची खात्री झाली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणाचाही मृत्यूची झालेला नाही. WHO नुसार, 21 मे पर्यंत 92 लॅबमध्ये मंकीपॉक्स विषाणू (Virus) संक्रमित नमुन्यांची खात्री झाली आहे. याशिवाय 28 संशयित प्रकरणांचा तपास सुरू आहे.
डब्ल्यूएचओच्या मते, प्रवासाचा इतिहास नसलेल्या लोकांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची खात्री होणे चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स विषाणू अशा लोकांमध्ये पसरत आहे जे एकतर संक्रमित लोकांच्या संपर्कात येत आहेत, त्यांच्या वापरलेल्या कपड्यांच्या किंवा टॉवेलच्या संपर्कात येत आहेत. डब्ल्यूएचओने फ्रंटलाइन कामगार आणि इतर आरोग्य कर्मचार्यांच्या (Health Employee) सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये व्हायरस वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
मंकीपॉक्स हा दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवण्यात आलेल्या माकडांमध्ये हे पहिल्यांदा आढळून आले. मंकीपॉक्सच्या संसर्गाची पहिली घटना 1970 मध्ये नोंदवली गेली. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या काही भागात आढळतो आणि अधूनमधून उर्वरित प्रदेशात पोहोचतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (World Health Organisation) नुसार, मंकीपॉक्समध्ये सामान्यतः ताप, पुरळ अशी लक्षणे दिसतात. सहसा दोन ते चार आठवड्यांपर्यंत ही लक्षणे दिसतात, जी स्वतःच निघून जातात. प्रकरणे गंभीर देखील होऊ शकतात. अलीकडच्या काळात, मृत्यूचे प्रमाण सुमारे 3-6 टक्के आहे, परंतु ते 10 टक्क्यांपर्यंत जास्त असू शकते.
युरोप-आफ्रिकेतील आजाराने वाढले टेन्शन; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या..