शाही तुकडा हा पदार्थ अनेकांना माहिती नाही. आपल्याकडे हा पदार्थ सर्रास हॉटेलमध्येही मिळत नाही. हा लाजवाब पदार्थ बनवण्यासाठी वेळ आणि साहित्य कमी लागते. एकदा का हा पदार्थ तुम्ही खाल्ला तर तुम्ही हा पदार्थ नेहमी करून खाल.
साहित्य घ्या मंडळीहो…
- ब्राऊन किंवा व्हाईट ब्रेड
- तूप
- दूध
- साखर
- ड्रायफ्रुट्स ( तुमच्या आवडीनुसार कोणतेही घ्या)
हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…
- सगळ्यात आधी तुम्हाला हव्या असलेल्या ब्रेडच्या स्लाईस घेऊन त्याच्या कडा काढून घ्या. त्याचे दोन त्रिकोणी भाग करुन घ्या. सगळ्या ब्रेडचे अशा पद्धतीने तुकडे करा.
- गॅसवर साखरेचा पाक करुन घ्या. हा साखरेचा पाक फार घट्ट किेंवा जाड करायची काहीच गरज नाही.फक्त पावाचे तुकडे पाकात भिजवायचे असल्यामुळे तसा आणि तेवढाच पाक तयार करा.
- एका भांड्यात तूप गरम करुन तुपात छान सोनेरी रंग येईपर्यंत पाव तळून घ्या.
- दुसरीकडे दूध गरम करायला ठेवा. त्याच्यापासून आपल्याला छान रबडी तयार करायची आहे. रबडीसाठी तुम्हाला दूध फारवेळ उकळावे लागते. ते जितकं आटेल तितका त्यामध्ये गोडवा वाढत राहतो. त्यामुळे बेतानेच साखर घाला.
- दूध जितकं आटेल आणि घट्ट होईल तितकं ते चांगलं लागतं. ही रबडी घट्ट होण्यासाठी तुम्ही फुल फॅट दूधाचा उपयोग केल्यास फारच उत्तम
- दूध चांगले आटले की, त्यामध्ये काजू-बदाम-पिस्ता छान पातळ चिरुन घाला. एका प्लेटमध्ये ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर ही रबडी ओता. याची चव थंड केल्यास अधिक चांगली लागते. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ थंड करुन मगच त्याचा आस्वाद घ्या.
संपादन : संचिता कदम
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- Sim Card Rules: मोठी बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार नाही नवीन सिम ; जाणुन घ्या कारण
- Aadhaar Card: सावधान! चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बनवणाऱ्यांवर होणार ‘ही’मोठी कारवाई; सरकारने दिली माहिती
- Maharashtra IMD Alert & Weather Forecast: शेतकऱ्यांनो तयारीत रहा; ‘त्या’ दिवशी होणार आहे अवकळी पाऊस
- WhatsApp New Features: भारीच.. आता व्हाट्सअप फोटोंमधून टेक्स्ट होणार कॉपी! जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट
- आनंदाची बातमी! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे OnePlus चा नंबर 1 5G स्मार्टफोन; पहा ऑफर