गाजर हलवा बनवण्याची रेसिपी अगदीच सोपी आहे. गाजर हलवा बनवायला वेळही कमी लागतो. आणि आज आम्ही सांगत असलेल्या गाजर हलव्याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे. ज्यामुळे या गाजर हलव्याची टेस्ट खूपच अप्रतिम लागते. आज आम्ही तुम्हाला गाजर हलवा खाण्याचे आरोग्यदायी फायदेही सांगणार आहोत.
गाजर हलवा बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो…
- अर्धा किलो किसलेले गाजर
- एक मध्यम आकाराची वाटी साखर
- वेलची पावडर
- सुका मेवा कापलेला
- अर्धी वाटी मावा (खवा)
- दोन मोठे चमचे तूप
- दूध
हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…
- गाजर किसून घ्या. कढईत तूप घाला आणि त्यात किसलेले गाजर घालून परता
- एका बाजूला पातेल्यात दूध तापवा
- गाजर वाफवून थोडे शिजल्यावर त्यात वरून साखर, दूध आणि खवा मिक्स करा
- हे नीट मिक्स करून पुन्हा शिजवा. शिजत आल्यावर वरून वेलची पावडर आणि सुका मेवा घालून नीट मिक्स करा आणि मस्तपैकी वाटीतून गरम गरम खायला द्या
फायदेही घ्या लक्षात :-
- गाजर कोलेस्ट्रॉलशी लढा देण्यासाठी उत्तम आहे आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राखले जाते
- गाजर हे पचनासाठी चांगले आहे. तसंच यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही
- विटामिन, मिनरल, अँटीऑक्सिडंटने युक्त गाजर हे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करते
संपादन : संचिता कदम
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : [email protected]
- New Upcoming IPO : पैसे कमावण्याची संधी! ‘या’ कंपन्यांचे IPO लवकरच येणार..
- Shikhar Dhawan Birthday : 10 वर्षांपासून टीम इंडियाच्या ‘गब्बर’चं रेकॉर्ड कायम; पहा, काय केली कमाल?
- Car Insurance Add Ons : कार विमा घेताय? ‘या’ 3 गोष्टी अॅड-ऑन कराच; टायर खराब झाला तरी मिळतील पैसे
- Hardik Pandya : बुमराह नंतर हार्दिक! BCCI ने तयार केला स्पेशल प्लॅन
- Byju’s Crisis : बॉस असावा तर असा! कंपनी संकटात सापडली, पगार देण्यासाठी स्वतःचं घरच ठेवलं गहाण