सर्वसाधारणपणे देशभरात बिर्याणी खावी तर नॉनव्हेजप्रेमींनीच, असा काहीसा समज आहे. मात्र व्हेज बिर्याणी काही ठिकाणी एवढी लाजवाब भेटते की नॉनव्हेजप्रेमीं चिकन किंवा मटन बिर्याणी खाण्याचे सोडून व्हेज बिर्याणी खायला सुरू करतील. आज आम्ही आपल्याला एका भन्नाट व्हेज बिर्याणीची रेसिपी सांगणार आहोत. जी खाल्ल्यावर तुम्हीही म्हणाल, वाह वाह क्या बात है…
साहित्य घ्या मंडळीहो…
- २ वाट्या तांदूळ
- बटाटा १ मोठा- १ इंचाचे तुकडे
- १ कप ग्रीन बीन्सचे (श्रावण घेवडा?) १ इंचाचे तुकडे
- २ मध्यम गाजर थोडे मोठे तुकडे
- १ .५ कप कॉलीफ्लावर मध्यम आकारचे तुकडे
- आलं लसूण १ टे. स्पून
- कांदा १ मोठा उभा चिरून
- टोमॅटो २ बारीक चिरून
- हि. मिरची ३ उभ्या चिरून
- लवंग ५-६
- हि. वेलची ५
- दालचिनी १ इंचाचे २-३ तुकडे
- मसाला वेलची २-३
- तमालपत्र ३-४ पानं
- काळी मिरी ८-९
- दही एक मोठा चमचा
- काजू १ वाटी- तळून घेऊन
- बेदाणे १/२ वाटी- तळून घेऊन
- केशर दोन तीन चिमूट – ३-४ मोठे चमचे दुधात खलून
- तूप २-३ चमचे
- बिर्याणी मसाला २ चमचे
- केवडा इसेंस १ टि. स्पून (ऐच्छिक)
- हळद एक लहान चमचा
- तळलेला कांदा १ वाटी
- बारीक चिरलेली कोथंबीर, पुदीना – दोन्ही मिळून अर्धी वाटी
- झाकणाच्या कडेनं लावायला कणीक
हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…
- तांदूळ स्वच्छ धुवून निथळून अर्धा तास ठेवा.
- तांदळाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल, १ मसाला वेलची, तमालपत्र घालून उकळी आणावी.
- तांदूळ एक-दोन कणी राहतील इतपत शिजवून उरलेलं पाणी पूर्णपणे काढून टाकून बाजूला ठेवावे.
- ज्या पातिल्यात बिर्याणी करायची त्यात तेल तापवायला ठेवावे.
- सगळा खडा मसाला घालून कांदा घालून परतून घ्यावा
- कांदा मऊ झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून १-२ मिनीटे परतावे
- टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परतावे
- हळद घालावी परत एकदा परतून घ्यावे
- बिर्याणी मसाला घालावा
- केवडा इसेंस घालावा, परतावे
- दही घालावे
- बटाटा, गाजर घालून परतावे
- उरलेल्या भाज्या घाल्याव्यात
- मीठ घालून नीट परतून घ्यावे
- भाज्या साधारण ३/४ शिजल्या की गॅस बंद करावा.
- भाताचा लेयर लावून लाकडी चमच्याच्या मागच्या बाजूने ५-६ भोकं पाडून त्यात केशराचं दुध घालावं उरलेलं दूध भातावर शिंपडावं.
- काजू, बेदाणे घालावेत, कडेने तूप सोडावे
- भरपूर बारिक चिरलेली कोथिंबीर, पुदीना घालावा
- तळलेला कांदा घालावा.
- झाकण लावून कडेनं कणीक लावून बंद करावं
- १ ते सव्वा तास मंद आचेवर ठेवावी. जाड बुडाच्या तव्यावर पातिलं ठेवल्यास खाली करपत नाही.
संपादन : संचिता कदम
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- Sim Card Rules: मोठी बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार नाही नवीन सिम ; जाणुन घ्या कारण
- Aadhaar Card: सावधान! चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बनवणाऱ्यांवर होणार ‘ही’मोठी कारवाई; सरकारने दिली माहिती
- Maharashtra IMD Alert & Weather Forecast: शेतकऱ्यांनो तयारीत रहा; ‘त्या’ दिवशी होणार आहे अवकळी पाऊस
- WhatsApp New Features: भारीच.. आता व्हाट्सअप फोटोंमधून टेक्स्ट होणार कॉपी! जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट
- आनंदाची बातमी! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे OnePlus चा नंबर 1 5G स्मार्टफोन; पहा ऑफर