FD Interest Hike : ग्राहकांची चांदी! ‘या’ बँकेच्या FD वर मिळतेय 9.75% बंपर व्याज, पहा

FD Interest Hike : अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. हे लक्षात घ्या की प्रत्येक बँकेचे FD दर हे वेगवेगळे असते. अशातच एका बँकेने आपल्या FD चे दर वाढवले आहेत.

FD वर मिळतोय बंपर परतावा

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेकडून त्यांच्या FD व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. तर ही बँक 546 – 1111 दिवसांच्या कालावधीसाठी 1 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या नॉन-रिफंडेबल ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.75% चा सर्वोच्च व्याज दर उपलब्ध करून देत आहे. परतफेड करण्यायोग्य ठेवींसाठी बँक त्याच कालावधीत 9.50% व्याज देत आहे.

ग्राहकांना मिळेल विशेष सुविधा

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांना घरी बसून एफडीमध्ये गुंतवणूक करता येईल. यासाठी तुम्हाला मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंगचा वापर करावा लागेल. ठेवीदाराच्या अधिकृत बचत खात्यावर FD खात्यातून मासिक किंवा त्रैमासिक व्याज मिळते. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक डोअरस्टेप बँकिंग, ऑटो रिन्यू, आंशिक पैसे काढणे, पुनर्गुंतवणूक पर्याय आणि कर्जसुविधा यासारख्या बँकिंग सेवा देत असून बँक एफडी वेळेपूर्वी काढले तर या बँकेकडून 1% दंड आकारला जातो.

रेपो दर जैसे थे!

काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने पतधोरण आढाव्यात रेपो दरात कोणताही बदल केला नाही. RBI ने तो 6.5 टक्के राखला असून मजबूत आर्थिक वाढीदरम्यान चलनवाढ नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नात, RBI ने सलग आठव्यांदा रेपो दर अपरिवर्तित ठेवलेला आहे. इतकेच नाही तर रेपो दरात कोणताही बदल केला नसल्याने बँक ठेवींवरील व्याजदरात कपात होण्याची शक्यताही मावळली आहे.

Leave a Comment