7th Pay Commission: येणाऱ्या काही दिवसात केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना पगारवाढीशी संबंधित एक आनंदाची बातमी मिळू शकते.
मीडिया रिपोर्ट नुसार लवकरच केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासंबंधी घोषणा करू शकते. यामुळे लवकरच केंद्र कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टर वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होणार आहे.
सरकारने त्यात वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारे किमान मूळ वेतन 18,000 वरून 26,000 पर्यंत वाढेल. अहवालात असे म्हटले जात आहे की सरकार लवकरच केंद्रीय कर्मचार्यांना दिला जाणारा महागाई भत्ता वाढवू शकते.
मात्र, या संदर्भात सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सध्या फिटमेंट फॅक्टर किती आहे?
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. जर असे गृहीत धरले की एखाद्याला 4200 ग्रेड पेमध्ये 15,500 रुपये मूळ वेतन मिळते, तर त्याचा एकूण पगार 15,500×2.57 म्हणजेच 39,835 रुपये असेल. सहाव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट रेशो 1.86 असण्याची शिफारस करण्यात आली होती.
फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची कर्मचाऱ्यांची मागणी केंद्रीय कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत.
जर ही वाढ झाली, तर सध्याचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल. त्याचबरोबर डीए वाढीबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते. डीएमध्ये वाढ होऊ शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांची डीए वाढ सरकारकडून वर्षातून दोनदा केली जाते. ही दरवाढ 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून लागू आहे.
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी जुलैमध्ये सरकार महागाई भत्त्यात आणखी 4 टक्क्यांनी वाढ करू शकते. मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्यात आली होती. जे 1 जानेवारी 2023 पासून लागू झाले. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ दिला जात आहे.