7th Pay Commission । कर्मचाऱ्यांची संपली प्रतीक्षा! DA बाबत महत्त्वाची माहिती आली समोर

7th Pay Commission । सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना आणत असते, ज्याचा त्यांना खूप लाभ होतो. अशातच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून कर्मचारी DA मध्ये वाढ होण्याच्या प्रतीक्षेत होते.

अशातच आता DA बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, मार्चमध्ये सरकार कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करू शकते.

असे झाले तर डीए आणि डीआर 50 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो. हे लक्षात घ्या की, DA आणि DR हा प्रत्येक वर्षी दोनवेळा वाढवला जातो. ही दरवाढ जानेवारी आणि जुलैमध्ये करण्यात येते.

केव्हा झाली डीएममध्ये शेवटची वाढ?

डीएममध्ये शेवटची वाढ ऑक्टोबर 2023 मध्ये झाली होती. ज्यावेळी डीएमध्ये 4 टक्के वाढ केली होती त्यानंतर महागाई भत्ता ४६ टक्क्यांवर पोहोचला होता. सध्याच्या महागाईनुसार, असा अंदाज आहे की सरकार पुन्हा एकदा 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकते. ज्याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. मार्चमध्ये महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला तर त्याचा लाभ १ जानेवारी २०२४ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

DA-DR कोणत्या आधारावर ठरवतात?

औद्योगिक कामगारांसाठी DA केंद्र सरकार CPI डेटा (CPI-IW) च्या आधारे निर्धारित करत असून जे 12 महिन्यांची सरासरी 392.83 आहे. यानुसार DA हे मूळ वेतनाच्या 50.26 टक्के असावे. आम्ही तुम्हाला सांगतो की, CPI-IW डेटा कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याला जारी करण्यात येतो.

Leave a Comment