7th Pay Commission : मोठी बातमी! कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने दिली मोठी भेट

7th Pay Commission : सध्या एक मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकारने आपल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना खूप मोठी भेट दिली आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या थेट खिशावर होणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे 30 मार्च

खरंतर ३१ मार्चला रविवार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 30 मार्चला पगार येणे अपेक्षित आहे. तथापि, भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी बँकांना रविवार असूनही काम करण्यास सांगितले आहे.

महागाई भत्ता 50 टक्के

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ मंजूर केली असून ही वाढ 46 टक्क्यांवरून 50 टक्के केली आहे. हे मागील जानेवारी महिन्यापासून लागू झाले आहे. अशा वेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकी मिळणार आहे. डीए 50 टक्क्यांवर पोहोचल्याने घरभाडे भत्त्यात देखील अशीच वाढ झाली.

शहराच्या वर्गीकरणानुसार कर्मचाऱ्यांना 30 टक्क्यांपर्यंत एचआरए मिळत असून डीएमध्ये वाढ झाली असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. यात बाल संगोपन, बालशिक्षण यांसारख्या भत्त्यांचा समावेश असून कर्मचाऱ्यांना या भत्त्यांचा दावा करावा लागतो.

48 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना होणार फायदा

48 लाखांपेक्षा जास्त केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा झाला असून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) हा कामगार ब्युरोद्वारे दरमहा जारी केलेल्या नवीनतम ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे ठरवण्यात येतो.

Leave a Comment