7th pay commission : मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! DA नंतर आता मूळ पगारात झाली ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

7th pay commission : केंद्र सरकार सतत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी घेऊन येत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. अशातच आता LIC कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारकडून एलआयसी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १७ टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे.

महागाई भत्त्यात झाली 4 टक्क्यांनी वाढ

हे लक्षात घ्या की सरकारने नुकत्याच महागाई भत्त्यात म्हणजेच डीएमध्ये 50 टक्के वाढ केल्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली असून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, या वाढीसह, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या टेक-होम सॅलरी पॅकेजमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार एचआरए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. या X, Y आणि Z श्रेणी आहेत.

समजा X श्रेणीचा कर्मचारी शहरे/नगरांमध्ये राहत असल्यास तर त्याचा HRA 30 टक्क्यांपर्यंत वाढेल. तर Y श्रेणीसाठी HRA दर 20 टक्के आणि Z श्रेणीसाठी 10 टक्के असतो. सध्या, शहरे/नगरे X, Y आणि Z मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27, 18 आणि 9 टक्के HRA देण्यात येत आहे.

डिसेंबर तिमाही निकाल

मागील महिन्यात, LIC ने डिसेंबर 2023 (Q3FY24) मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 49 टक्के वाढ नोंदवून ती 9,444 कोटी रुपये इतकी नोंदवली होती. देशातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीला मागील वर्षी याच कालावधीत 6,334 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तिचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वाढ होऊन रु. 1,17,017 कोटी झाले होते, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत रु. 1,11,788 कोटी इतके होते.

Leave a Comment