दिल्ली : कडाक्याच्या उन्हात देशातील कोळशाचे संकट (Coal Crisis) अधिक गडद होत आहे. कोळशाच्या संकटाने इतके भयंकर स्वरूप धारण केले आहे की, त्याचा रेल्वे वाहतुकीवरही (Railway Transport) गंभीर परिणाम होत आहे. कोळशाच्या टंचाईमुळे रेल्वेने तब्बल 735 रेल्वे फेऱ्या रद्द (Cancel) केल्या आहेत. रेल्वेने आदेश जारी करून म्हटले आहे की, देशातील कोळशाचा पुरवठा करण्यासाठी पॅसेंजर रेल्वे प्रामुख्याने रद्द केल्या जात आहेत.

दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या 11 जोड्या मध्यम एक्सप्रेस रेल्वे आणि 6 जोड्या पॅसेंजर रेल्वे (Passenger Railway) रद्द करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. याशिवाय उत्तर रेल्वेकडून 2 जोड्या मध्यम एक्स्प्रेस आणि 2 पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात येत आहेत. एक्स्प्रेस रेल्वेच्या 13 जोड्या आणि पॅसेंजर ट्रेनच्या 8 जोड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या मध्यम एक्स्प्रेसच्या 343 फेऱ्या आणि पॅसेंजर रेल्वेच्या 370 फेऱ्या रद्द केल्या जातील, तर मध्यम एक्स्प्रेसच्या 20 फेऱ्या आणि उत्तर रेल्वेच्या 20 पॅसेंजर रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार नाहीत. देशात कोळशाच्या कमतरतेमुळे एकूण 753 रेल्वे फेऱ्या रद्द राहतील.

विशेष म्हणजे, कडक उन्हामुळे देशातील जवळपास सर्वच राज्यात विजेची मागणी (Increase in power Demand) वाढली आहे. दुसरीकडे कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्रातील वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. वीजटंचाईमुळे देशातील अनेक राज्यांतील लोकांना वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. सरकारने बुलडोझर थांबवावा आणि वीज प्रकल्प चालवण्यावर भर द्यावा, असे म्हणत शुक्रवारी राहुल गांधी यांनी वीजकपातीवरुन भाजपवर निशाणा साधला.

रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, केवळ प्राधान्य नसलेल्या आणि कमी गर्दीच्या मार्गावरील रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत जेणेकरून कोळशाच्या हालचालींना गती मिळू शकेल. कोळसा वाहून नेण्यासाठी एकूण 533 रेल्वे तैनात करण्यात आल्याची माहितीही रेल्वेने दिली आहे. त्यापैकी ऊर्जा क्षेत्रासाठी एकूण 1.62 दशलक्ष टन कोळसा पुरवठा करण्यात आला आहे. रेल्वेने असेही म्हटले आहे की या रेल्वे तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत आणि रेल्वे दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहे.

Government Jobs: रेल्वेमध्ये सुरू आहे नोकरभरती; हजारो पदांवर होणार आहे नेमणूक

Share.

Leave A Reply

Exit mobile version