मुंबई :
राज्यातील जैवविविधता रक्षण आणि संवधर्न याची मोठी जबाबदारी राज्याच्या वन विभागावर आहे. मात्र, या विभागातील अनागोंदी आणि त्यातील आर्थिक हितसंबंध जपण्याच्या नादात राज्यातील वनसंपदा धोक्यात आलेली आहे. अशावेळी आगीच्या घटना वाढत असतानाच या विभागाने ‘ब्लोविंग फोर्स’लाच सोडचिठ्ठी देण्याची कमाल केली आहे.
वणवा नियंत्रण हा एक महत्वाचा मुद्दा असतो. उन्हाळ्यात मानवाकडून जाणीवपूर्वक किंवा नैसर्गिक कारणांनी असे वनवे लागून राज्याची जैवविविधता धोक्यात येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच वृक्षलागवड आणि त्यावरील खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी किंवा पुरावे गायब करण्यासाठी वनाच्या क्षेत्रात आगीच्या घटना वाढत असल्याचे बोलले जात आहे. अशावेळी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाचा असलेला ‘ब्लोविंग फोर्स’ हा मुद्दाच वन विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी गायब केला आहे.
वन विभागाने आधुनिकीकरण आणि वणवा नियंत्रण ही बाब महत्वाची असल्याचे लक्षात घेऊन दि. ८ डिसेंबर २०२० रोजी आग विझावणाऱ्या ब्लोअर या यंत्राचे स्पेसिफिकेशन (मापदंड) निश्चित केले होते. त्यावेळी त्यात किमान ३८ न्यूटन इतका ‘ब्लोविंग फोर्स’ असण्याचा महत्वाचा मुद्दा टाकलेला होता. मात्र, चारच महिन्यात काहीतरी ‘खेळ’ झाला आणि हा महत्वाचा मुद्दा गायब करण्याची किमया वन विभागाने साधली आहे. त्यामुळे याचे नेमके गौडबंगाल आहे तरी काय, हाच प्रश्न कायम आहे.
नव्या परिपत्रकात (दि. २५ मार्च २०२१) ‘ब्लोविंग फोर्स’ हा महत्वाचा मुद्दा या विभागाने सपशेल गायब केला आहे. कोणत्याही क्षेत्रात सुधरी बदल करताना आधुनिकीकरण आणि उपयोगिता हा मुद्दा महत्वाचा असतो. मात्र, राज्याचा वन विभाग त्यास अपवाद आहे. माजी वनमंत्री संजय राठोड यांना पदावरून पायउतार व्हावे लागल्यावर मग या विभागाची जबाबदारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. मुख्यमंत्र्यांचे पर्यावरणप्रेम जगजाहीर आहे. तरीही त्यांच्या कार्यकाळात असा नकारात्मक बदल करून राज्यातील जंगले अडचणीत आणण्याचे कार्य कसे झाले, याचे कोडे पर्यावरण प्रेमींना पडले आहे.
जगभरात फायर ब्लोअर पुरवठा करणाऱ्या STIHL या कंपनीच्या वेबसाईटवर स्पष्टपणे म्हटलेले आहे की, A Newton is a unit of force, combining air velocity and air volume into one easy-to-understand unit of measure. अर्थात न्यूटन फोर्स हा घटक आग विझावाण्यामध्ये खूप महत्वाचा आहे. मात्र, त्याच महत्वाच्या मुद्द्याला सोडचिठ्ठी देऊन आधुनिकीकरणाचा मुद्दा राज्याच्या वन विभागाने बासनात गुंडाळला आहे. विशेष म्हणजे ब्लोविंग फोर्स हा मुद्दा शास्त्रीयदृष्ट्या महत्वाचा असल्याने महसूल व वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे यांनीच दि. ८ डिसेंबर २०२० चे पत्र काढले होते. आताही दि. २५ मार्च २०२१ रोजीचे पत्र त्यांच्याच स्वाक्षरीचे आहे. अशा पद्धतीने एकाच अधिकाऱ्याने वन विभागाला जुन्या वळणावर नेण्याचे आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्वाचा असलेला घटक वगळल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे याप्रकरणी आता मुख्यमंत्री व वनमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात, याकडे राज्यातील पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागलेले आहे.
Blowing Force | Measuring Blower Performance | STIHL USA
लेखन व संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..
- Loksabha Election 2024: राज्यात होणार भाजपचा पराभव? राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन तयार, वाचा सविस्तर
- 7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, खात्यात जमा होणार 48,000 रुपये; वाचा सविस्तर
- Egg Benefits : काय सांगतात, ‘या’ वेळी रोज अंडी खाल्ल्यास मानसिक तणाव होतो दूर, जाणुन घ्या कसं
- Relationship Tips: रिलेशनशिप येणार बदल, फक्त करा ‘हे’ 5 काम; होणार फायदा
- Gold Price Today: सोनं विकलं जातंय स्वस्त, खरेदीसाठी जमली गर्दी; जाणुन घ्या नवीन दर