मुंबई :
सध्या टीम इंडिया जोमात आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक चालू आहे. भारतीय टीमची ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेतील ही जोरदार कामगिरी त्यांना एक मोठा विजय आणि आत्मविश्वास देऊन गेली. याच पार्श्वभूमीवर खुश होऊन ऑटो क्षेत्रातील नावाजलेल्या महिंद्रा या कंपनीने टीम इंडियाच्या काही खेळाडूंना एक जबरदस्त भेट देऊ केली आहे.
महिंद्रा या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत माहिती दिली की, महिंद्रा कंपनी टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना एक दमदार भेट देणार आहेत. महिंद्रा या खेळाडूंना Mahindra THAR-SUV ही प्रचंड प्रसिद्ध असलेली गाडी गिफ्ट म्हणून देणार आहेत.
या खेळाडूंना दिली जाणार Mahindra THAR-SUV :-
शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, थंगारासू नटराजन, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर
महिंद्रा हे नेहमीच अनेक खेळाडूंना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात. त्यांनी खेळाडूंना भेट देण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी याआधी 2007 मध्ये बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला 2017 मध्ये सीरिज टायटल जिंकलं होतं यानिमित्ताने महिंद्रा यांनी श्रीकांतला TUV 300 भेट दिली होती.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- Fig Side Effects: उन्हाळ्यात अंजीर खात असाल तर ‘ही’ बातमी वाचाच, होणार फायदा
- Manipur Violence: मणिपूर पुन्हा पेटला, 40 जण ठार , जाणुन घ्या लेटेस्ट अपडेट
- New Rules: मोठी बातमी, देशात 1 जूनपासून बदलणार ‘हे’ 3 मोठे; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम
- Maharashtra Politics: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ? 22 आमदार सोडणार पक्ष, ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा
- Bank FD Rate: ग्राहकांना होणार बंपर फायदा, ‘या’ 2 सरकारी बँकांनी वाढवले FD व्याज दर, जाणुन घ्या दर