5 Seater Car । जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला 5 सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आता एक शानदार संधी आहे. तुम्ही आता स्वस्तात जबरदस्त मायलेजसह उत्तम फीचर्स असणारी कार खरेदी करू शकता. पहा संपूर्ण ऑफर.
निसान मॅग्नाइट
ही Nissan Magnite कार आहे. या कारमध्ये शक्तिशाली 999 cc पेट्रोल इंजिन दिले आहे. तर ही कार उच्च गतीसाठी रस्त्यावर जास्तीत जास्त 72 PS आणि 96nm टॉर्क जनरेट करते. कंपनीची ही कार 150 kmph चा टॉप स्पीड देते, ती मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्ससह तुम्हाला खरेदी करता येईल. तर या कारमध्ये एक मोठा हेडलाइट आणि 5 स्पीड ट्रान्समिशन आहे. कारमध्ये 336 लीटरची मोठी बूट स्पेस दिली आहे.
Nissan Magnite ही कुटुंबासाठी सुरक्षित कार असून तिला ASEAN NCAP क्रॅश चाचणीमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. कारला 16-इंचाचे मोठे अलॉय व्हील्स दिले आहेत. या कारच्या पुढील बाजूस स्टायलिश ग्रिल उपलब्ध असून या कारचा ग्राउंड क्लीयरन्स 205 मिमी आहे. तसेच या कारमध्ये चाइल्ड अँकरेज आणि मागील सीटवर सहा एअरबॅग्ज सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
निसान मॅग्नाइटने जून 2024 मध्ये 2107 युनिट्सची विक्री केली असून कंपनीची कार XE, XL, XV, Turbo, Premium, Premium Turbo (O), आणि Geza Edition अशा एकूण सात प्रकारांमध्ये येते. कारचे टॉप मॉडेल 13.74 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये टर्बो इंजिन मिळेल. हे लक्षात घ्या की ही कार सीएनजी किंवा डिझेलमध्ये येत नाही. कारमध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स दिले आहेत.
Nissan Magnite ची स्पर्धा Citroen’s C3, Renault Kiger आणि Tata Panch सोबत असून पंचमध्ये इलेक्ट्रिक, पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. तर पंचमध्ये सिटी आणि इको असे दोन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत, ही कार पॉवर विंडो आणि 16 इंच टायर आकारासह येते.