अहमदनगर : कर्नाटकातील अफझलपूर तालुक्यातील बळोरगी येथे शुक्रवारी (ता. 11) दुपारी ३ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात अहमदनगरमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अफझलपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अर्णव वीर, हिराबाई वीर, छाया बाबासाहेब वीर अशी या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची नावे आहेत. सायली बाबासाहेब वीर व चैत्राली दिनकर सूर्यवंशी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाणगापूर येथील दत्त महाराजांचं दर्शन घेऊन वीर कुटुंब कारमधून परत येत होते. गाणगापूर-सोलापूर मार्गावर कर्नाटक हद्दीतील बळोरगी गावाच्या परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. अपघाताबाबत माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.
भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर झाला. गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन जखमींना तातडीने अफझलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघाताबाबत अफजलपूर पोलिस अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात येते.
कारचा चक्काचूर..!
गाडीवर MH 16 BH 5392 असा नंबर आहे. तसेच शिकाऊ चिन्ह असलेलं ‘L’ असंही गाडीच्या मागच्या काचेवर दिसून आलं. ‘डॅटसन गो प्लस’ या कारतून हे सर्व जण प्रवास करीत होते. गाडीनं समोरच्या बाजूनंच झाडाला धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर झाला.
तांदळापासून घरीच बनवा अक्की रोटी.. चव आहे अप्रतिम.. ही घ्या सोपी Recipe
एसटी संपाबाबत मोठी बातमी, मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले महत्वपूर्ण आदेश..!