Rajkot Game Zone Fire : राजकोट गेम झोन आगीत 33 जणांचा मृत्यू, 3 अटक जाणुन घ्या आतापर्यंत काय घडले

Rajkot Game Zone Fire : राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या आगीत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षेचे नियम लक्षात न ठेवल्याने एवढी मोठी दुर्घटना घडली.

आग इतकी भीषण होती की, मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यासाठी डीएनए नमुने घेण्यात येत आहेत.

 तर आता या प्रकरणात गेम झोनच्या मालकासह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

 गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. आगीच्या घटनेत आत्तापर्यंत काय घडले ते जाणून घ्या.

शनिवारी, टीआरपी गेम झोनमध्ये आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण परिसर आगीच्या ज्वाळांनी जळून खाक झाला. या घटनेत आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

या आगीच्या तपासासाठी 5 सदस्यांची टीम तयार करण्यात आली असून त्याचे नेतृत्व एडीजीपी सीआयडी सुभाष त्रिवेदी करणार आहेत.

गेमिंग झोन हे रबर-रेक्झिन फ्लोअरिंगचे बनलेले असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. जनरेटरसाठी 1500 लिटर डिझेल ठेवण्यात आले होते. आणि गो कार रेसिंगसाठी 1000 लिटर डिझेल देखील होते. यासाठी अग्निशमन विभागाकडून एनओसी घेण्यात आलेली नाही.

गेम झोनचा मालक, व्यवस्थापक आणि ऑपरेटरला रविवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयानेही तीव्र प्रतिक्रिया देत उत्तर मागितले आहे.

सध्या बचावकार्य सुरू असून परिसराला नो-एंट्री झोनमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. मृतदेहाचे डीएनए नमुने घेऊन ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

Leave a Comment