30 Sep Deadline : दर महिन्याला काही ना काही आर्थिक बदलाची सुरुवात होते. पण 30 सप्टेंबर हा दिवस (30 Sep Deadline) अनेक कारणांसाठी महत्त्वाचा आहे. कारण सुमारे अर्धा डझन मुख्य कामांसाठी ही अंतिम मुदत आहे. 2 हजार रुपयांच्या नोटेची गोष्ट 30 सप्टेंबरलाच संपणार आहे. याचा अर्थ 30 सप्टेंबरनंतर कोणतीही देवाणघेवाण शक्य होणार नाही. तसेच बदलता येत नाही. याशिवाय अनेक बँकांनी विविध नियमांसाठी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. याशिवाय आर्थिक संबंधित बदलही या तारखेपासून होणार असल्याचे सांगितले जात आहे. 30 सप्टेंबर मध्यमवर्गीयांसाठी किती खास आहे ते जाणून घेऊ या..
दोन हजार रुपयांची नोट बँकेत जमा करा
रिजर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर ही दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्याची शेवटची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांची नोट आहे त्यांनी ताबडतोब एक्सचेंज करा किंवा बँकेत जमा करा. कारण, 30 सप्टेंबरनंतर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यानंतर तुम्ही त्या दोन हजार रुपयांच्या नोटेने काहीही खरेदी करू शकत नाही. कारण रिजर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 2 हजार रुपयांची नोट बंद होईल.
खाते निलंबित केले जाईल
स्मॉल सेव्हिंग स्कीमसाठी आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचे खाते 1 ऑक्टोबर 2023 रोजी निलंबित केले जाईल. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा इतर पोस्ट ऑफिस योजनांसारख्या लहान बचत योजनांसाठी KYC अनिवार्य करण्यात आले आहे. त्याची अंतिम मुदतही 30 सप्टेंबर आहे. त्यामुळे तुमचे आधारकार्ड संबंधित संस्थेकडे वेळेवर जमा करण्याची खात्री करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
स्टेट बँक वीकेयर स्कीम
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्पेशल वीकेयर स्कीम अंतर्गत गुंतवणूक, आयडीबीआय अमृत महोत्सव एफडीमध्ये गुंतवणूक आणि डीमॅट, म्युच्युअल फंडमध्ये नामांकन करण्यासाठी देखील 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) डीमॅट खातेधारकांसाठी, नामांकन किंवा नामांकनातून बाहेर पडण्याची अंतिम तारीख देखील 30 सप्टेंबर 2023 निश्चित केली आहे.