मुंबई – क्रिकेट (Cricket) हा भारतातील (India) सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम (Record) झाले आणि मोडले गेले. पण आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच तीन विक्रमांबद्दल सांगत आहोत, ज्यांना चाहते अफवा समजत असले तरी हे विक्रम प्रत्यक्षात घडले आहेत. या विक्रमांबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे असे कोणते रेकॉर्ड्स आहेत ज्यांची माहिती फार कमी चाहत्यांना आहे.

एका ओव्हरमध्ये 17 चेंडू टाकले
एका क्रिकेट ओव्हरमध्ये बॉलर 6 बॉल टाकतो, पण एकदा बॉलरने 17 बॉल्सचे ओव्हर टाकले. ही घटना 2004 साली पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात घडली होती. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामीने एका षटकात 17 चेंडू टाकले. या षटकात त्याने 4 नो बॉल आणि 7 वाईड बॉल टाकले. आजही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात लांब षटक म्हणून त्याची नोंद आहे. या षटकात त्याने एकूण 22 धावा दिल्या. ज्यामध्ये दोन चौकारांचाही समावेश होता.

एका दिवसात कसोटी सामन्याचे चार डाव खेळले गेले
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात दोन्ही संघांच्या चारही डाव खेळण्याचा अनोखा विक्रम 2000 साली इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव 267 धावांत गुंडाळला. यानंतर, त्याच दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडला केवळ 134 धावांवर ऑलआउट केले आणि त्याच दिवशी वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 54 धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या दिवशीच इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला. दुसऱ्या दिवसाच्या खेळात दोन्ही संघांना आपले दोन्ही डाव खेळण्यासाठी उतरावे लागले, याची इतिहासात नोंद झाली.

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

द्रविडने सलग तीन षटकार ठोकले
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्या संथ फलंदाजीसाठी ओळखला जातो, त्याला द वॉल म्हणून ओळखले जाते. चाहते त्याला षटकार मारण्यासाठी ओळखत नाहीत, पण राहुल द्रविडनेही सलग तीन षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. 2011 साली इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात त्याने सलग तीन षटकार ठोकले होते.

Share.

Leave A Reply

Exit mobile version