दिल्ली :
कृषी कायद्यावरून सध्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर गोंधळ चालू आहे. सरकार आपल्या खरेपणाचे दाखले देत आहे तर शेतकरी या कायद्यांचे तोटे सांगत आहेत. जीव तोडून शेतकरी आंदोलन करत असले तरीही असंवेदनशील सरकारने अद्यापही त्यावर तोडगा काढलेला नाही. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
हे कृषी कायदे शेतकर्यांना संपवणारे आणि काही मूठभर उद्योजकांना मोठे करणारे असल्याची टीका सातत्याने शेतकरी आंदोलांनाच्या नेत्यांनी केली होती. याच अनुषंगाने एका आयपीएस अधिकार्याने अत्यंत महत्वाची माहिती समोर आणली आहे.
निवृत्त आयपीएस अधिकारी रमेश सवाणी यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या विनय दुबेंनी हरियाणातील पानीपत जवळील नोल्था या गावात जाऊन परिसराचे व्हीडियो व फोटो काढून ते ७ नोव्हेंबर २०२० रोजी सोशल मीडियावर टाकले आहेत. या भागात अदानींनी १०० एकर जमीन दोन वर्षापूर्वीच विकत घेतली आहे.
याच ठिकाणी ब्रोडगेज रेल्वेलाईन सुद्धा तयार झाली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये नवे कृषी विधेयके कायद्यात रूपांतरित होण्याधीच अन्नधान्यांची साठवणूक करण्यासाठीची गोदामे उभी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे नव्या कायद्यात अदाणीसारखे शेतकरी (?) हवे तितके धान्याचा साठा करु शकतील.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, केवळ नोल्था गावातच नाही तर इतर भागातील तब्बल १,००० एकरांवर सुमारे ९,००० महाकाय गोदामे उभी करण्याचे अदानी यांचे नियोजन व त्याची पूर्वतयारी झालेली आहे. आता विचार करा, की अदानी इतक्या प्रचंड प्रमाणात अन्नधान्याची साठवणूक करण्याचे काम ‘गोरगरीबांना स्वस्तात धान्य मिळावे म्हणून करतील की चढ्या भावने भरपूर नफा मिळवण्यासाठी करतील’?
यातून हे स्पष्ट होते की, फक्त शेतकरीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांचीही लूटमार करण्याची रीतसर योजना तयार झाली आहे, असे म्हटले तर वावगं ठरू नये.
या अधिकार्यांनी अजूनही काही गोष्टी समोर आणून दिल्या आहेत. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी सध्याचे पंतप्रधान मोदी हे अदानी यांच्या विमान आणि हेलिकॉप्टरमधून देशभर फिरले होते. मागील ६ वर्षांत, इलेक्ट्रिक पॉवर उत्पादन आणि वीजपुरवठा करणे, घरगुती गॅस असो, सीएनजी पुरवठा असो, किंवा पोर्ट व एअरपोर्ट असो अथवा ऑस्टेलियातील कोळसा खाणीच्या प्रकल्पासाठी स्टेट बैंक ऑफ इंडियाकडून अब्जावधी रुपयांचे कर्ज मिळवणे असो, या सर्व बाबतीतच अदानींनी आश्चर्यकारक अशी मोठी झेप घेतलेली दिसते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : [email protected]
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच