अहमदनगर :
म्हशी किंवा गायींच्या लाखात असणार्या किमती आपण आजवर ऐकलेल्या आहेत. मात्र आता नगरमधील एका शेळीची जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. ही शेळी चक्क दीड लाख रुपयांना विकली गेली आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की, आजवर अनेक शेळ्या बघितल्या, किमती बघितल्या, असं काय खास आहे या शेळीत?
तब्बल दीड लाख रुपये किंमत असलेली ही शेळी आफ्रिकन बोर जातीची आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आहे. संदीप परशराम मिसाळ यांनी ही शेळी फलटण येथील तेजस भोईटे यांना दीड लाखाला विकली आहे. संदीप मिसाळ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचा गर्भ देशी शेळीच्या गर्भाशयात ठेवून त्यापासून भारतात ही जात वाढविण्यात आलेली आहे. या जातीच्या शेळ्या आपण उपलब्ध करून त्यांचे पालन केले आहे. या जातीमध्ये प्रतिकारशक्ती अधिक असते. त्यांची वाढही चांगली होती.
अधिक माहिती सांगताना ते म्हणाले की, दिवसाला साधारणपणे २०० ते २५० ग्रॅमने त्यांचे वजन वाढत जाते. त्यामुळे या जातीच्या बोकडांना चांगला भाव मिळतो. साधारणपणे तीन महिन्यांत बोकड २५ ते ३० किलो वजनाचा होतो. आपल्याकडील प्रचलित जातींपेक्षा ते जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी काळात जास्त उत्पन्न मिळते. वजनदार बोकडांना जन्म देणाऱ्या म्हणून या जातीच्या शेळ्यांना जास्त किंमत आहे.
आता कितीही वैशिष्ट्यपूर्ण शेळी असली तरी दीड लाखाला का विकत घेतली, हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. याविषयी बोलताना शेळी विकत घेणारे भोईटे यांनी सांगितले की, ही शेळी दोन वर्षे वयाची आहे. तिचे वजन ७० किलो आहे. लवकरच ती पिल्लांना जन्म देणार आहे. एकावेळी दोन किंवा तीन पिल्ले नक्की होतात. काही महिन्यांतच त्यांच्या विक्रीतून लाखो रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या किमतीला ही शेळी विकत घेतली.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : [email protected]
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच