मुंबई :
प्लास्टिक कचऱ्याच्या डिस्पोजल आणि कलेक्शनची माहिती सरकारी बॉडीला न दिल्यामुळे बलाढ्य अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांना दंड ठोठावण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोका कोला, पेप्सी, बिसलेरी व बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचा समावेश आहे.
सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड यांनी ही कारवाई केली आहे. सर्वांना 15 दिवसात दंडाची रक्कम भरावी लागेल. प्लास्टिक कचऱ्याप्रकरणी एक्सटेंडेड प्रोड्यूसर रिस्पांसिबिलिटी (EPR) एक पॉलिसी मानक आहे, ज्या आधारे प्लास्टिक निर्माण करमाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्रोडक्टच्या डिस्पोजलची जबाबदारी घ्यावी लागते, त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे.
जानेवारी ते सप्टेंबर 2020 दरम्यानचा विचार करून हा दंड लावण्यात आलेला आहे. बिसलेरीच्या प्लास्टिकचा कचरा अंदाजे 21 हजार 500 टन होता. यावर 5 हजार रुपये प्रती टन हिशोबाने दंड लागला आहे. याशिवाय, पेप्सीकडे 11,194 टन आणि कोका कोलाकडे पास 4,417 टन प्लास्टिक कचरा होता.
बाबा रामदेव यांच्या पतंजलीवर 1 कोटी रुपयांची पेनल्टी लागली आहे. बिसलेरीवर 10.75 कोटी, पेप्सिको इंडियावर 8.7 कोटी आणि कोका कोला बेवरेजेसवर 50.66 कोटींचा दंड लावण्यात आला आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : [email protected]