मुंबई :
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021 चा अर्थसंकल्प सादर केल्यावर महाराष्ट्रातून नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महाराष्ट्राला नेमके काय दिले यावर आकडेबंबाळ बजेटचा लेखाजोखा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे.
काही जणांनी गैरसमज पसरवले आहेत. पाच वर्षात जे पैसे मिळायला हवे होते, त्याच्या अनेक पट महाराष्ट्राला वर्षाला मिळाले. हा मोदी सरकार आणि दुसऱ्या सरकारमधील फरक आहे, असा दावा फडणवीस यांनी पत्रकार परिषेदेत केला आहे.
बजेटमधील महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रमुख तरतुदी अशा :
> मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 1832 कोटींची तरतूद
> पुणे मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 3195 कोटींची तरतूद
> नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात 5976 कोटींची तरतूद
> नाशिकमधील रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात 2092 कोटींची तरतूद
> राज्यातील रस्तेबांधणीसाठी एक लाख कोटींपेक्षा जास्त बजेट मिळालं आहे.
> 10 हजार किमी पेक्षा जास्त रस्ते बांधले जातील
> मुंबईला पिण्याचं पाणी मिळावं या प्रोजेक्टसाठी 3 हजार कोटी रूपये
> घरोघरी पाणी मिळाव यासाठी 1 हजार कोटी रूपये
> शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6 हजार 823 कोटी
> रेल्वे प्रकल्पांसाठी 86696 कोटींची तरतुद झालीय, त्यापैकी यावर्षी सात हजार कोटी महाराष्ट्राला मिळाले आहेत.
> बीड परळी रेल्वेमार्गालाही पैसे मिळाले आहेत
> मुंबईच्या लाईफलाईन लोकलसाठी साडे सहा कोटी रूपये दिले
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : [email protected]