Mumbai Airport Gold Smuggling: एक मोठा बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर गेल्या आठ दिवसात तब्बल 21 किलो तस्करीचे सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 13 कोटी 57 लाख रुपये असल्याची सांगितली जात आहे.
माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी आतापर्यंत मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या आठ प्रकरणांचा पर्दाफाश करून 13.57 कोटी रुपयांचे 20.95 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. याव्यतिरिक्त अधिकाऱ्यांनी 23 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, तंबाखू आणि सिगारेटही जप्त केल्या आहेत.
तर या प्रकरणात आतापर्यंत 25 जणांना अटक करण्यात आली असून त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नैरोबी येथील एका नायजेरियन प्रवाशाचाही समावेश आहे, ज्याच्या ताब्यात 1.17 किलो वजनाच्या सात 22 कॅरेट सोन्याचे बार एका बॅगेत सापडले आहेत.
याशिवाय बहरीन आणि नैरोबी येथील अन्य दोन आरोपींच्या अंडरवेअरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे बार आणि चामड्याच्या पिशवीत लपवून ठेवलेली 22 कॅरेट सोन्याची नाणी सापडली. ज्याचे वजन 946 ग्रॅम असल्याचे सांगितले जाते.
सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली आठ भारतीयांनाही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कपड्यांमध्ये किंवा शरीरात लपवून ठेवलेले 9.6 किलो सोने जप्त केले आहे. हे सोने तस्करी करून कोठून नेले जात होते, याचा तपास कस्टम विभाग करत आहे.