सातारा :
दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आला आहे. आज संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज ‘चक्का जाम’ करण्यात येणार आहे. हे देशव्यापी आंदोलन असून यात काँग्रेसही प्रचंड आक्रमक झाली आहे. काँग्रेसनेही अनेक ठिकाणी रस्त्यावर येत कृषी कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर विविध मार्गानी हल्लाबोल केला आहे. नव्या काँग्रेस राज्य कार्यकारिणीमुळे काँग्रेसला उर्मी आल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांचाही ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये समावेश आहे. कराड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : [email protected]
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच