मुंबई : यामाहा कंपनीच्या वाहनांची देशात एक वेगळीच क्रेझ आहे. अन्य कंपन्यांच्या दुचाकीच्या तुलनेत यामाहाच्या दुचाकी एकदम हटके आहेत. वेगळे फिचर्समुळे या दुचाकी वेगळ्या ठरतात. आताही कंपनीने देशातील बाजारपेठेत नवीन Yamaha MT-15 लाँच केले आहे. कंपनीने बाजारात याची किंमत 1.6 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे अनेक नवीन वैशिष्ट्ये, हार्डवेअर बदल आणि नवीन रंग पर्यायांसह सादर केले गेले आहे.
2022 Yamaha MT-15 V2.0 हे 4 रंग पर्यायांमध्ये ऑफर केले आहे. मोटारसायकल दिसायला आधीच्या मॉडेलसारखीच आहे. यात एलईडी डीआरएल, इंधन टाकीसह सिंगल-पॉड प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प मिळतो. 2022 Yamaha MT-15 V2.0 हे 4 स्ट्रोक, SOHC, 4 व्हॉल्व्ह, व्हेरिएबल व्हॉल्व्ह सिस्टमसह 155cc चे इंधन इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 10,000rpm वर 18.4PS आणि 7,500rpm वर 14.1Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मोटारसायकलला डिजिटल एलसीडी क्लस्टर मिळतो जो गीअर शिफ्ट, गीअर पोजिशन मिळते. हे ब्लूटूथ वाय-कनेक्ट अॅपला समर्थन देते जे कॉल, ई-मेल आणि एसएमएस अलर्ट प्रदर्शित करते. अॅप स्मार्टफोनवर सेवेची माहिती, पार्किंगचे ठिकाण आणि इंधनाची माहिती देते.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) आणि बॅटरी उत्पादकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि जीवनावश्यक घटकांच्या किमती वेगाने वाढत आहेत. जेव्हा देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी जास्त असेल तेव्हा ही अडचण आणखी वाढू शकते, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत वाढू शकते, असे सांगण्यात आहे. तसे पाहिले तर सध्याच्या परिस्थितीत या वाहनांच्या किंमती खूप जास्त आहेत. त्यामुळे जास्त मागणी मिळत नाही. त्यात सरकारकडून अनुदान दिले जात आहे. त्यामुळे किंमती काही प्रमाणात कमी होतात. अशी परिस्थिती असताना किंमती वाढल्या तर वाहनांच्या मागणीत घट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
अर्र.. चारचाकीनंतर आता दुचाकी..! 5 एप्रिलपासून खिशाला झटका देणार ‘या’ कंपनीच्या दुचाकी..