Take a fresh look at your lifestyle.

टेन्शन घेऊ नका.. ‘या’ सोप्या पद्धतींनी वाढते वजन करा कंट्रोल; फक्त ‘या’ नियमांकडे द्या लक्ष

अहमदनगर : आजच्या काळात मानवी जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. या गोष्टींकडे आपण सहसा लक्ष देत नाही. मात्र, भविष्यात त्याचा आरोग्यावर परिणाम होतोच. आता वाढत्या वजनाची समस्या सर्वत्र दिसून येत आहे. वाढलेले वजन सुद्धा अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करणे महत्वाचे ठरते. यासाठी अनेक जण हजारो रुपये खर्च करतात. मात्र, काही सोपे नियमांचे पालन केले तरी आपण वाढते वजन नियंत्रणात आणू शकतो. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर कितीही प्रयत्न केले तरी उपयोग होणार नाही. त्यामुळे नियम पाळणे महत्वाचे ठरते.

Advertisement

सायंकाळच्या आहारात कॅलरीजवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. आहारात तुम्ही किती कॅलरीज वापरत आहात, यावर लक्ष हवे. त्याचा वजन कमी करण्यासाठी चांगला परिणाम होतो. फक्त निर्धारीत कॅलरीज घ्या आणि एकदा जेवण केले की पुन्हा शक्यतो काही खाणे टाळा.

Advertisement

दिवसातील आहाराच्या वेळा ठरवून घेतल्या तर फायद्याचे ठरते. मधल्या वेळेत काहीतरी खावे. ज्यामुळे जास्त खाणे टाळणे शक्य होते. यामुळे वाढते वजन नियंत्रणात राहिल. सायंकाळच्या वेळचा आहार शक्यतो हलका असावा.

Advertisement

टिव्ही किंवा मोबाइल समोर ठेऊन खाणे योग्य पद्धत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही आहार घेत असाल तर यामुळे तुम्ही निर्धारीत प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज घेता. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. या सवयी बंद करणे महत्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement

वजन कमी करण्यासाठी `हे` पाच महिने आहेत योग्य.. जाणून घ्या काय आहे कारण?

Advertisement

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात या चार प्रकारच्या रोट्या.. कोणकोणते घटक आहेत त्यात?

Advertisement
Advertisement

Leave a Reply