Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. ‘या’ देशांत कोरोनाने उडालाय हाहाकार; आफ्रिकन देशांतून येणाऱ्या विमानांवर बंदी; पहा, काय आहे परिस्थिती

नवी दिल्ली : सध्या युरोप आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. आता तर दक्षिण आफ्रिकेत नवा व्हेरिएंट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. युरोपातील अनेक देशांत कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे या देशांनी लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध अमलात आणणे सुरू केले आहे. ब्रिटेन, इस्त्रायल या देशांनी 6 आफ्रिकन देशांतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.

Advertisement

फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, पोर्तूगाल, ब्रिटेन या देशांमध्ये कोरोनाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. काही देशांनी आणीबाणी जाहीर केली आहे, तर काहींनी शाळा, कार्यालये पुन्हा एकदा बंद केली आहेत. आफ्रिकेतल्या सहा देशांतून येणाऱ्या विमानांवरही बंदी जाहीर केली आहे. B.1.1.529 असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत.

Advertisement

कोरोनाच्या नव्या लाटेने फ्रान्स, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, ब्रिटेन, पोर्तूगाल, या देशांमध्ये थैमान घातले आहे. फ्रान्समध्ये एका दिवसात 33 हजार 464 नवे रुग्ण सापडले. एप्रिलनंतर एवढे रुग्ण एकाच दिवसात सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दक्षिण आफ्रिकेत 2 हजार 465 नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आकडा 321 टक्क्यांनी अधिक आहे. जर्मनीत तर कोरोनाने हाहाकार उडाला आहे. एका दिवसात 75 हजार 565 नवे कोरोना रुग्ण सापडलेत. हा आतापर्यंतचा रूग्ण सापडण्याचा सर्वात मोठा आकडा आहे.
अमेरीकेतही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 1 लाख 17 हजार, 666 एवढे नवे रुग्ण सापडले. दीड हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 18 दिवसांपासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. बेल्जियममध्ये कोरोनाचे 23 हजार 350 नवे रुग्ण सापडले आहेत. ऑक्टोबरनंतरचा हा सर्वात मोठा रुग्ण आकडा आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण हे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने संक्रमित असल्याचे समोर आले आहे. या नव्या व्हेरिएंटने अनेक देशांत खळबळ उडाली आहे.

Advertisement

बाब्बो..आता ‘या’ देशात कोरोनाचे थैमान; एकाच दिवसात सापडलेत इतके कोरोना रुग्ण

Advertisement

.. अन् तरीही ‘त्या’ देशांना कोरोना रोखता येईना; पहा, युरोपीय देशांत कशामुळे वाढतोय कोरोना

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply