Take a fresh look at your lifestyle.

कमाईची संधी..! हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचा आयपीओ येतोय..

मुंबई : अनेक नावाजलेल्या कंपन्या या वर्षी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्या. पेटीएमने 18300 कोटी, तर झोमॅटोचा 9375 कोटींचा आयपीओ बाजारात आला होता. आता यंदाच्या आर्थिक वर्षातील सर्वात मोठा तिसरा ‘आयपीओ’ येणार आहे.. विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीने आपल्या ‘आयपीओ’द्वारे समभागाची विक्री करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने ‘आयपीओ’चा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. समभाग विक्रीतून स्टार हेल्थ कंपनी 7249 कोटी रुपये उभारणार आहे.. प्रति शेअरसाठी 870 ते 900 रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे..

Advertisement

स्टार हेल्थ कंपनीचा आयपीओ (IPO) 30 नोव्हेंबर रोजी येतो आहे. हा आयपीओ 2 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी, हा आयपीओ 29 नोव्हेंबर रोजी उघडू शकतो. या इश्यूमध्ये फ्रेश इक्विटी शेअर्सव्यतिरिक्त, ऑफर फॉर सेल (OFS) देखील असेल. शेअर मार्केटमधील दिग्गज राकेश झुनझुनवाला व त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची या कंपनीत सुमारे 18.21 टक्के भागीदारी आहे.

Advertisement

स्टार हेल्थच्या आयपीओमध्ये 2,000 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स असतील. त्याच वेळी, 5.83 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेलही (OFS) असेल. सध्याचे शेअर होल्डर्स ऑफर फॉर सेलद्वारे त्यांचे स्टेक कमी करतील. हा आयपीओ क्यूआयबीसाठी 75 टक्के, एनआयआयसाठी 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के समभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.

Advertisement

स्टार हेल्थने त्यांच्या आयपीओसाठी 870-900 रुपये प्रति शेअर इतका प्राइस बँड निश्चित केला आहे, तर लॉट साइज 16 शेअर्सचा असेल. किमान एक लॉट खरेदी करणे आवश्यक आहे. 900 रुपयांवरच्या प्राइस बँडच्या बाबतीत, या इश्यूमध्ये किमान 14400 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यानंतर, 16 शेअर्सच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते.

Advertisement

बाब्बो.. अमेरिकेच्या एकाच झटक्याने चीन-पाकिस्तान हैराण; कोट्यावधींचा बसणार फटका
सोने-चांदी पुन्हा चमकले..! युरोपातील कोरोनाचाही पडलाय ‘असा’ इफेक्ट; जाणून घ्या अपडेट

Advertisement
Advertisement

Leave a Reply