Take a fresh look at your lifestyle.

दोन वर्षात इलेक्ट्रीक वाहने होणार स्वस्त; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेय गणित

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. इंधनाचे भाव अनेकांच्या आवाक्याबाहेर होत आहेत. त्यामुळे लोक आता अन्य पर्यायांचा विचार करत आहेत. इलेक्ट्रीक वाहनांचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे कंपन्याही विविध इलेक्ट्रीक कार आणि दुचाकी वाहने बाजारात आणत आहेत. इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय असला तरी या वाहनांच्या किंमती सध्या जास्त आहेत. त्यामुळे ही वाहने घेण्याची नागरिकांची तयारी होत नाही. आता मात्र या परिस्थितीत बदल होईल अशी शक्यता दिसत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी याबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

Advertisement

आगामी दोन वर्षात चारचाकी इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांप्रमाणेच होतील, असे गडकरी यांनी सांगितले. म्हणजेच, आगामी काळात इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती कमी होतील, असे दिसून येत आहे. इलेक्ट्रीक वाहने कमी खर्चात जास्त अंतर चालतात. त्यामुळे देशात इलेक्ट्रीक वाहनांची मोठ्या संख्येने विक्री होईल. पेट्रोलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान दहा रुपये तर डिझेलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान सात रुपये खर्च येतो. मात्र, विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रति किलोमीटर एक रुपया इतकाच खर्च येतो, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

गॅसोलिन आणि डिझेल या पारंपारिक इंधनाचा वापर कमी करण्यासाठी इथेनॉल आणि सीएनजीसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Advertisement

सरकार इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग सुविधेत वाढ करण्याचाही विचार करत आहे. सन 2023 पर्यंत प्रमुख राज्यमार्गांवर 600 चार्जिंग स्टेशन उभे केले जाणार आहेत. इतकेच नाही, तर सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या नवीन उर्जास्रोतांवर चालणारी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचाही विचार केंद्र सरकार करत आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांची संख्या कमी असल्याने किंमती जास्त आहेत.

Advertisement

देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी आहेत. इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी 5 टक्के आहे आणि लिथियम बॅटरीच्या किमतीही कमी होऊ लागल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

महाराष्ट्र सरकारचे ई-व्हेईकल्स धोरण जाहीर, इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर मिळणार घसघशीत सूट..

Advertisement

भारतातील ‘ही’ दिग्गज कंपनीही आणणार इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये जातेय तब्बल 375 किलोमीटर

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply