Take a fresh look at your lifestyle.

अर्र… इंग्रजांचा आणखी एक विचित्र निर्णय; पाकिस्तानचे होणार कल्याण, अफगाणिस्तानचा त्रास वाढणार..

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवट आल्यापासून जगाचे टेन्शन वाढले आहे. तालिबान सरकारच्या अडचणीत वाढ करण्याचे काम अमेरिकेसह अन्य काही देशांनी केले आहे. मात्र, आता या मुद्द्यावर जगातील देश दोन गटात विभागले आहेत. चीन, पाकिस्तान, रशिया, तुर्की, कतर यांसारखे देश आधीपासूनच तालिबानचे समर्थन करत आहेत. त्यानंतर आता ब्रिटेन सुद्धा या गटात सामील होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, काही दिवसांपासून या देशाच्या नेत्यांची वक्तव्ये तशाच पद्धतीने येत आहेत. आता तर चक्क या देशाच्या नेत्याने आणखी एक धक्कादायक विधान केले आहे.

Advertisement

अफगाणिस्तान मधील नागरिकांची मदत करायची असेल तर तालिबान सरकारचे सहकार्य घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले होते. त्यानंतर आता जॉन्सन यांचे प्रतिनिधी निगेस केसी यांनी तर अफगाणिस्तान मध्ये दहशतवादी कारवाया वाढू नयेत, यासाठी पाकिस्तानचे सहकार्य घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर जगभरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण, ज्या देशाने कायमच दहशतवादास खतपाणी घातले. दहशतवाद्यांना संरक्षण दिले अशा देशाच्या मदतीने दहशतवाद रोखण्याचे स्वप्न ब्रिटेन पाहत आहे.

Advertisement

अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी मदत म्हणून 5 कोटी पाऊंड देण्याची घोषणा ब्रिटेनने आधीच केली आहे. अफगाणिस्तान मध्ये सध्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या कमी करण्याच्या उद्देशाने ब्रिटेन कार्यवाही करणार आहे. आणि यासाठी पाकिस्तान मदत करणार आहे. असेच याद्वारे स्पष्ट होत आहे. मात्र, या पद्धतीच्या कार्यवाहीतून उद्देश साध्य होण्याची शक्यता कमीच आहे.

Advertisement

अफगाणिस्तान मध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यास पाकिस्तानही तितकाच जबाबदार आहे. अनेक नेत्यांनी तसा आरोप केला आहे. तालिबान्यांना पाकिस्तानचे समर्थन आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तालिबानला मान्यता मिळवून देण्यासाठी पाकिस्तान आटोकाट प्रयत्न करत आहे.

Advertisement

या देशाची मदत आता ब्रिटेन घेणार आहे. त्यामुळे ब्रिटेनच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेने अद्याप या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेकेची प्रतिक्रिया महत्वाची राहणार आहे. कारण, ब्रिटेन आणि अमेरिका मित्र देश आहेत. सध्याचे अमेरिकेचे धोरण पाकिस्तान विरोधात आहे. त्यामुळे अमेरिका काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

राजकारण फिरले…! आधी तालिबानला नकार आता मात्र दुसरा पर्याय नाही; पहा, कुणी केलाय ‘हा’ दावा..

Advertisement

तालिबानसाठी पाकिस्तानने केलाय ‘हा’ नवा प्लान; चीनही करतोय मदत; पहा, काय सुरू आहे राजकारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply