Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. वेस्ट इंडिजने सामना गमावला पण, भारतीय संघाला बसलाय धक्का; पहा, नेमके काय घडलेय..?

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी सध्याचा काळ काही ठीक दिसत नाही. टी 20 विश्वकप स्पर्धेत पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने पराभव केला. त्यानंतर आयसीसी टॉप 10 फलंदाजांच्या यादीत फक्त एक खेळाडू चमकला. गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तर एकही भारतीय खेळाडू नाही. त्यानंतर आता टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.

Advertisement

श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा 187 रन्सने पराभव केला. त्यामुळे श्रीलंकेने आता भारतीय संघास मागे टाकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा पराभव करुन 12 पॉईंट्सची कमाई केली. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील ही श्रीलंकेची पहिलीच टेस्ट होती. त्यामुळे त्यांची सरासरी आता 100 टक्के आहे.

Advertisement

आयसीसीच्या नियमानुसार एकूण टक्केवारीच्या आधारावरच टॉप टीमचा निर्णय होणार आहे. टीम इंडियााचे सध्या 26 पॉईंट्स आहेत. प्रत्येक मॅच जिंकल्यानंतर 12 तर ड्रॉ झाल्यानंतर 4 पॉईंट्स मिळतात. टीम इंडियाकडे सध्या 54 टक्के पॉईंट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान संघ आहे. वेस्ट इंडिजचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

Advertisement

दरम्यान, टी 20 विश्वकप स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. पहिल्याच फेरीत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. विशेष म्हणजे, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीतही भारतीय खेळाडूंना जोरदार झटका बसला आहे.

Advertisement

या यादीत के. एल. राहुल वगळता एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. रोहित शर्माने चांगली कामगिरी केली आहे. मात्र तरीसुद्धा या यादीत त्याचा विचार केल्याचे दिसत नाही. या यादीत रोहित शर्मा थेट 13 व्या क्रमांकावर गेला आहे. पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माचा विचार केलेला नाही.

Advertisement

विराट-रोहितला धक्का..! म्हणून आयसीसीने केलेय दुर्लक्ष; ‘त्या’ यादीत फक्त एकच भारतीय खेळाडूचा समावेश

Advertisement
Advertisement

Leave a Reply