Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! रेल्वे मंत्रालयाने केलीय मोठी घोषणा; पहा तर खरं काय घेतलाय निर्णय

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे विभागाने एक खुशखबर दिली आहे. कोरोना काळात बंद केलेल्या काही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात रेल्वेमध्ये काही महत्वाचे बदल दिसतील. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने रेल्वेने काही निर्णय घेतले होते. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर या निर्णयात बदल करण्यात येत आहे.

Advertisement

कोरोनाचे संक्रमण वाढल्याने देशभरात लॉकडाऊन केले होते. रेल्वे फेऱ्याही बंद होत्या. या काळात रेल्वे प्रवासी वाहतूक बंद होती. आता मात्र कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे ट्रेन पुन्हा रुळावर आल्या आहेत. मात्र, कोरोनाचे संक्रमण नियंत्रित करण्यासाठी आणि कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठी काही सुविधा पुर्णपणे बंद आहेत.

Advertisement

आता बऱ्याच काळानंतर ट्रेनमध्ये पुन्हा शिजलेले अन्न देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करुन माहिती दिली आहे. या निर्णयानुसार आता लवकरच ट्रेनमध्ये शिजलेले अन्न मिळण्यास सुरुवात होणार आहे. सध्या राजधानी, दुरांतो, शताब्दी, तेजस, गतिमान एक्सप्रेस या रेल्वेमध्ये केटरिंग सुविधा असेल. या अंतर्गत शिजलेले अन्न प्रवाशांना देण्यात येईल.

Advertisement

त्यानंतर पुढील टप्प्यात सर्वच ट्रेनमध्ये ही योजना पुन्हा सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. देशभरातील रेस्टॉरन्टस्, हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी कोविड लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. सणासुदीच्या काळात रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे दैनंदीन व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी विविध सरकारी विभागांनी काही निर्णय घेतले होते. आता या निर्णयांमध्ये पुन्हा बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार रेल्वेनेही काही निर्णयात बदल केले आहेत.

Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, रावसाहेब दानवे यांनी केली महत्वाची घोषणा, वाचा तर खरं..

Advertisement

प्रवासी तिकीट आरक्षणाबाबत रेल्वेची मोठी घोषणा.. काय घेतलाय निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply