Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक खुशखबर..! मोठा खर्च होणार कमी; पहा तर काय आहे निर्णय..?

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार कमी होत असताना भारतीय रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेने आणखी एक खुशखबर दिली आहे. रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचा खर्च कमी होणार आहे. याआधीही रेल्वेने काही निर्णय घेतले होते. त्यानंतर आता काही दिवसात काही निर्णयात बदल केला आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

Advertisement

कोरोना काळात देशभरात लॉकडाऊन होते. या काळात कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी रेल्वेने प्रवासी वाहतूक बंद केली होती. त्यानंतर आता मात्र परिस्थिती बदलली आहे. कोरोना आटोक्यात आला आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले आहेत. या परिस्थितीचा विचार करुन रेल्वेनेही काही निर्णयात बदल केला आहे. रेल्वेमध्ये आता नेहमीप्रमाणे शिजलेले अन्न देण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी एक असाच दिलासादायक निर्णय घेतला आहे.

Advertisement

कोरोना काळात रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटामध्ये वाढ करण्यात आली होती. प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा तिकीटाचे दर 50 रुपयांहून दहा रुपये करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. सुरुवातीला काही ठराविक स्टेशनवर दहा रुपयात प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा निर्णय देशभरात सर्वत्र अमलात आणला जाणार आहे. काही ठिकाणी आजपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशास मोठा फटका बसला. या काळात रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढली होती. ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली होती. त्यामुळे रुग्णांना कमी वेळेत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस सुरू केल्या होत्या. या एक्सप्रेसद्वारे देशभरातील हजारो रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता.

Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! रेल्वे मंत्रालयाने केलीय मोठी घोषणा; पहा तर खरं काय घेतलाय निर्णय

Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, रावसाहेब दानवे यांनी केली महत्वाची घोषणा, वाचा तर खरं..

Advertisement
Advertisement

Leave a Reply