Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अमेरिकेच्या एकाच झटक्याने चीन-पाकिस्तान हैराण; कोट्यावधींचा बसणार फटका

नवी दिल्ली : एकपक्षीय हुकुमशाही असलेला चीन सध्या जगासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. चीनच्या कारवाया अनेक देशांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे हे देश आता सतर्क झाले आहेत. चीनमधील एखादी कंपनी असो किंवा चीन आपल्या देशात गुंतवणूक करणार असो, प्रत्येक मुद्द्यावर आता विचार होत आहे. अमेरिकेने तर अनेक मुद्द्यांवर चीनला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही देशातील वाद वाढला आहे. आताही अमेरिकेने चीनला जबरदस्त झटका दिला आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे चीनचे मोठे आर्थिक नुकसान होणार हे नक्की आहे.

Advertisement

देशाच्या सुरक्षेचे कारण पुढे करत अमेरिकेने 12 चिनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. फक्त चीनच नाही तर पाकिस्तान, जपान, सिंगापूर आणि रशिया या देशांच्या कंपन्यांवरही कारवाई केली आहे. अमेरिकेने एकूण 27 विदेशी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. यामध्ये 12 कंपन्या चीनच्या आहेत. अमेरिकेच्या या निर्णयाचा चीनला मोठा फटका बसणार आहे.

Advertisement

चिनी सेनेच्या आधुनिकीकरणात मदत करणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध टाकले आहेत. पाकिस्तानचेही मोठे नुकसान होणार आहे. पाकिस्ताना आधीच आर्थिक संकटात अडकला आहे. त्यात आता पाकिस्तानी कंपन्या काळ्या यादीत गेल्याने या देशाच्या अडचणी वाढणार आहेत. पाकिस्तानच्या असुरक्षित परमाणू प्रकल्पही रोखला जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी चीनने तैवानच्या मुद्द्यावर अमेरिकेला धमकी दिली होती. अमेरिकेने एका संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनात तैवानला आमंत्रित केले होते. त्यामुळे चीन चांगलाच संतापला. रागाच्या भरात चीनी नेत्यांनी अमेरिकेस धमकी दिली होती. या मुद्द्यावर अमेरिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर मात्र चीनच्या कंपन्या काळ्या यादीत टाकून चीनला मोठा झटका दिला आहे.

Advertisement

अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. कोरोनाच्या संकटाने चीनच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला आहे. या संकटातून बाहेर पडत असतानाच चीनमध्ये विजेचे मोठे संकट उभे राहिले. या संकटामुळेही अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले. त्यानंतर आता अमेरिकेने काही चिनी कंपन्यांना जोरदार झटका दिला आहे. त्याचाही परिणाम भविष्यात दिसणार आहे.

Advertisement

म्हणून अमेरिकेच्या ‘त्या’ निर्णयावर भडकलाय चीन; पहा, अमेरिकेचा नेमका काय आहे प्लान..?

Advertisement

तैवानचा मास्टरस्ट्रोक..! चीनच्या विरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चीनच्या धमक्याही ठरल्या फेल

Advertisement
Advertisement

Leave a Reply