Take a fresh look at your lifestyle.

लोकसंख्या वाढीला ब्रेक..! देशात प्रजनन दरात घट, महाराष्ट्र किती क्रमांकावर आहे, वाचा..

मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षण-५ (एनएचएफएस-५) च्या दुसऱ्या टप्प्यातील आकडेवारी नुकतीच जाहीर केली. त्यात देशातील प्रजनन दर २.२ वरून दोनवर आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडसह १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 22 राज्यांची आकडेवारी जाहीर केली होती. 2019-21 दरम्यान ‘एनएचएफएस-5’ सर्वेक्षण केले आहे, तर ‘कॉन्ट्रासेप्टिव प्रिव्हेलेंस रेट’ हा 54 वरून 67 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Advertisement

2015-16 मध्ये केलेल्या ‘एनएचएफएस-4’ सर्वेक्षणात देशातील एकूण प्रजनन दर (प्रति महिला मुलांची सरासरी संख्या) 2.2 नोंदविला होता. मात्र, आता हा दर 2 वर आला आहे. सर्वात कमी प्रजनन दर चंदीगडमध्ये 1.4, तर सर्वाधिक दर उत्तर प्रदेशमध्ये 2.4 नोंदविला गेला आहे.

Advertisement

मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश वगळता सर्वच राज्यांनी प्रजनन दर 2.1 किंवा त्यापेक्षा कमी करण्याचे लक्ष्य गाठले आहे. राष्ट्रीय स्तरावर गर्भनिरोधकांच्या वापराचे प्रमाण 54 वरून 67 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, पण पंजाबमध्ये हा दर अजूनही कमी आहे. गर्भनिरोधकांच्या आधुनिक पद्धतींचा वापरही वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

Advertisement

बाळांचे लसीकरण वाढले
तसेच, 12-23 महिन्यांच्या बाळांच्या लसीकरणाचे प्रमाणही वाढले असून ते 62 ते 76 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सर्वेक्षण केलेल्या 14 पैकी 11 राज्यांमध्ये या वयातील तीन चतुर्थांश मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ओडिशामध्ये सर्वाधिक ९० टक्के बालकांच्या लसीकरणाची नोंद झाली आहे.

Advertisement

दरम्यान, चार वा त्याहून अधिक प्रसूतीपूर्व चाचण्या झालेल्या गर्भवती महिलांची टक्केवारीही 51 वरून 58 टक्क्यांवर गेलीय. पंजाब वगळता सर्वच राज्यांमध्ये प्रगती झाली आहे. संस्थात्मक प्रसूती 79 वरून 89 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये 100 टक्के संस्थात्मक प्रसूती झाल्या आहेत, तर 7 राज्यांमध्ये हे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक होते. खासगी क्षेत्रातील संस्थात्मक प्रसूतींमध्येही सर्जिकल प्रसूतीचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे.

Advertisement

दरम्यान, बालकांच्या पोषणामध्येही थोडी प्रगती झाली आहे. कमी उंचीच्या मुलांची टक्केवारी 38 वरून 36 वर आली आहे. कमकुवत (वजन ते उंचीचे प्रमाण) मुलांची संख्या 21 ते 19 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. कमी वजनाच्या मुलांची संख्या 36 वरून 32 टक्क्यांवर आली आहे.

Advertisement

अर्र… इंग्रजांचा आणखी एक विचित्र निर्णय; पाकिस्तानचे होणार कल्याण, अफगाणिस्तानचा त्रास वाढणार..
… म्हणून वाढलेत भाजीपाल्याचे भाव; जाणून घ्या, काय आहे नेमके कारण; तज्ज्ञांनी व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज

Advertisement
Advertisement

Leave a Reply