Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी पुन्हा चमकले..! युरोपातील कोरोनाचाही पडलाय ‘असा’ इफेक्ट; जाणून घ्या अपडेट

मुंबई : युरोपमधील काही देशात कोरोनाने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील काही देशांनी लॉकडाऊन केले आहे. या काळात आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळले आहेत. परिणामी, जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढत आहेत. देशांतर्गत सोने बाजारात सुद्धा सोन्याचे दरात वाढ होत आहे. आज गुरुवारी कमॉडिटी बाजारात सोन्याचे भाव 150 रुपयांनी वाढले. चांदीचे दर 267 रुपयांनी वाढले. सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली.

Advertisement

कमॉडिटी बाजारात सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47 हजार 539 रुपये आहे. यामध्ये 101 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव 62 हजार 913 रुपये असून यामध्ये 278 रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीने 63 हजार 75 रुपयांचा टप्पा गाठला होता. याआधी मागील आठवड्यात सोने आणि चांदीचे दर कमी झाले होते.

Advertisement

गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार आज गुरुवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 620 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 47 हजार 620 रुपये आहे. आज राजधानी दिल्ली शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 840 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 51 हजार 90 रुपये आहे. चेन्नई शहरात 22 कॅरेटसाठी 44 हजार 960 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 50 रुपये इतका आहे. कोलकाता शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार 90 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 790 रुपये इतका आहे.

Advertisement

काम की बात : सोने पुन्हा चमकले.. पुढील वर्षी देणार इतके टक्के परतावा..

Advertisement

सोने-चांदीच्या दरात तेजी..! आज पुन्हा सोन्याचे दर वाढले; जाणून घ्या काय आहेत नवीन दर

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply