Take a fresh look at your lifestyle.

बिजनेस आयडीया..! बिजनेस सुरू करण्याचा आहे विचार..? मग, ‘हे’ आहेत कमी खर्चातील बिजनेस; जाणून घ्या, महत्वाची माहिती

अहमदनगर : कोरोनाच्या संकटात देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला. या काळात अनेक उद्योग कारखाने बंद पडले. लाखो लोक बेरोजगार झाले. आता मात्र कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे देशभरात रोजगाराचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. तसेच या काळात अनेक नवीन कंपन्या आणि उद्योग सुरू झाले आहेत. काही असेही बिजनेस आहेत की जे आपण आपला रोजगार सांभाळून सुद्धा करू शकतो. यामध्ये थोडी मेहनत घेतली तर चांगले उत्पन्न सुद्धा मिळवता येते.

Advertisement

अत्यंत कमी खर्चात आपणास हे बिजनेस सुरू करता येऊ शकतात. आज आपण अशाच एका बिजनेस आयडियाबाबत माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही अगदी घरबसल्या चांगले उत्पन्न मिळवू शकता. या बिजनेसचे ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटींग करूनही उत्पन्नात वाढ करता येईल.

Advertisement

लिफाफे तयार करणे हा अतिशय सोपा आणि स्वस्त असा बिजनेस आहे. ते पॅकेजिंगसाठी वापरले जातात. लिफाफे कागद किंवा कार्डबॉर्डद्वारे तयार केले जातात. या लिफाफ्यांसाठी मागणी नेहमीच असते. त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून सुद्धा सुरू करू शकता.

Advertisement

हा बिजनेस साधारण 10 हजार ते 30 हजार रुपयांमध्ये सुरू करता येईल. जर हा व्यवसाय तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेन तर त्यासाठी लिफाफे तयार करण्याचे मशीन खरेदी करावे लागेल. मशीनसाठी मात्र जास्त पैसे खर्च करावे लागतील.

Advertisement

आता गिफ्ट पॅकिंग करणे तसेच भाजीपाला ठेवण्यासाठी पाकिटांचा वापर वाढला आहे. पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकला पर्याय म्हणून या कागदी पाकिटांचा वापर होत आहे. आजकाल बहुतांश दुकानदार प्लास्टिक पिशवीऐवजी कागदापासून तयार केलेल्या पाकिटांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ही कागदी पाकिटे तयार करून आपण दरमहा चांगले उत्पन्न मिळवू शकतो.

Advertisement

बिजनेस ग्रोथसाठीही महत्वाचे आहे रिब्रँडिंग; वाचा व्यवसायासाठी महत्वाची माहिती

Advertisement

उद्योगींची नोंदवही : स्टार्टअप म्हणजे ‘हे’; बिजनेस इच्छुकांनी वाचा ‘ही’ महत्वाची माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply