Take a fresh look at your lifestyle.

… म्हणून वाढलेत भाजीपाल्याचे भाव; जाणून घ्या, काय आहे नेमके कारण; तज्ज्ञांनी व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज

नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून इंधनाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे. या एका कारणामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोठ्या शहरात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. राज्यासह देशातील काही प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे दर 80 ते 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे शहरात एक किलो टोमॅटोचे दर 80 रुपये झाले आहेत. चेन्नईमध्ये तर 160 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री होत आहे.

Advertisement

दक्षिण भारतातून येणाऱ्या टोमॅटोची आवक मंदावल्याने दरामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र येणाऱ्या काळात भाजीपाल्याचे भाव कमी होऊन काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सध्या राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे धुक्याचे प्रमाण देखील वाढले आहे. वाढत्या धुक्यामुळे दिल्लीत वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक ठप्प असल्याने बाहेरून येणारा भाजीपाला हा शहरात पोहोचण्यात अडचणी येत आहे. तसेच दक्षिण भारतातून येणारी टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढले आहेत. मुंबई पुण्यासारख्या इतर शहरांमध्ये देखील आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे दिसून येते. मात्र येणाऱ्या काळात दिल्लीतील प्रदूषण कमी होऊन, वाहतूक पूर्ववत झाल्यास टोमॅटोचे दर कमी होऊ शकतील, तसेच पुढील महिन्यापासून दक्षिण भारतातून येणाऱ्या टोमॅटोची आवक वाढण्याचा अंदाज आहे. टोमॅटोची आवक वाढल्यास दर कमी होतील.

Advertisement

सध्या फक्त टोमॅटोच नाही तर अन्य प्रकारच्या भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. भाजीपाला दरावर कुणाचेही नियंत्रण नसते. विक्रेते ठरवतील तोच दर असतो. यामध्ये किरकोळ विक्रेत्यांचाच जास्त फायदा होत आहे. सध्या काही शहरांत वाटाणे 100 रुपये प्रति किलो, कांदा 30 रुपये किलो, बटाटा 40 रुपये किलो पर्यंत पोहोचला आहे.

Advertisement

शेतकरी उपाशी, विक्रेते तुपाशी..! भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply