Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार..? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय ‘हा’ इशारा

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र, धोका अजूनही कायम आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लोकांचा बेजबाबदारपणा वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. डिसेंबर महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. मात्र, या लाटेची तीव्रता कमी असू शकते. लोकांनी घाबरू नये. पण, काळजी घेणे महत्वाचे आहे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशास बसला होता. राज्यात या लाटेचा जास्त प्रादुर्भाव होता. आता मात्र या लाटेचा जोर कमी झाला आहे. कोरोनाचे रुग्ण सुद्धा वेगाने कमी होत आहेत. त्यामुळे सरकारने निर्बंध कमी केले आहेत. दैनंदीन घडामोडी पुन्हा नेहमी प्रमाणे सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढली आहे. लोकांचा निष्काळजीपणाही वाढला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. मास्कचा वापर कमी होत आहे. परिणामी कोरोनाचा धोका वाढला आहे.

Advertisement

राज्यात डिसेंबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते. मात्र, ही लाट आली तरी यावेळी तीव्रता जास्त नसेल. तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असाही एक अंदाज व्यक्त होत आहे. राज्यात लसीकरणाचा वेग चांगला आहे. त्यामुळे कदाचित लाट आली तरी या लाटेची तीव्रता फार नसेल, असे सांगण्यात येत आहे. कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर 2020 मध्ये तर दुसरी लाट एप्रिल 2021 मध्ये आली होती.

Advertisement

सध्या राज्यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. कोरोनाचा प्रसार कमी करण्यात लसीकरण प्रभावी ठरले आहे. याआधीच्या तुलनेत कोरोना संक्रमणाचा वेग कमी आहे. मृत्यूदर शून्याच्या जवळ आहे. मात्र, डिसेंबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते. मात्र, लसीकरणाचा वेग चांगला असल्याने या लाटेची तीव्रता फार नसेल. रुग्णालयात आयसीयू आणि ऑक्सिजनची गरज कमी असेल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, या आधी दिवाळीनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे टोपे यांनी सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका अजून कायम असल्याने लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार..?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेय महत्वाचे विधान; पहा, नेमके काय म्हटलेय त्यांनी

Advertisement

बाब्बो..आता ‘या’ देशात कोरोनाचे थैमान; एकाच दिवसात सापडलेत इतके कोरोना रुग्ण

Advertisement
Advertisement

Leave a Reply