Take a fresh look at your lifestyle.

अखेर पाकिस्तानने घेतली माघार..! ‘त्या’ निर्णयाने भारताचा होणार फायदा; अफगाणिस्तानलाही मिळणार मदत

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवटीत अन्नधान्याचा मोठा दुष्काळ पडला आहे. या संकटाच्या काळात भारताने अफगाणी नागरिकांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयात मात्र पाकिस्तान त्रासदायक ठरत होता. आता मात्र हा त्रास मिटला आहे. त्यामुळे भारताकडून अफगाणिस्तानला 50 हजार मेट्रीक गहू आणि जीवनावश्यक औषधांचा पुरवठा केला जाणार आहे.

Advertisement

भारताने याआधीही अनेक वेळा अफगाणिस्तानला मदत केली आहे. आता तर या देशात तालिबान्यांचे राज्य आहे. या सरकारच्या काळात येथील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. लोकांकडे पैसा राहिला नाही. तसेच येथे खाद्य पदार्थांचा प्रचंड दुष्काळ पडला आहे. जगभरातील अनेक देश मदत देण्यास तयार आहेत. भारताने गहू आणि आवश्यक औषधे देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, या निर्णयात पाकिस्तान अडसर ठरत होता.

Advertisement

कारण, अफगाणिस्तानला पाकिस्तान मार्गे गहू आणि औषधे पाठवण्यात येणार होती. त्यामुळे याकामी पाकिस्तानने मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी, असे भारताने म्हटले होते. भारताने केलेल्या या मागणीवर विचार करणार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यावेळी सांगितले होते.

Advertisement

त्यानंतर मात्र या मुद्द्यावर पाकिस्तानने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे अफगाणिस्तान मध्ये गहू पोहोच करणे शक्य होत नव्हते. आता मात्र पाकिस्तानने निर्णय घेत पाकिस्तान मार्गे गहू आणि औषधे घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. पाकिस्तानने फक्त गहू आणि औषधे निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे आता धान्य वाहतुकीतील अडचणी मिटल्या आहेत.

Advertisement

भारताने मागील दहा वर्षांच्या काळात अफगाणिस्तानसाठी दहा लाख मेट्रीक टन गहू दिले आहेत. मागील वर्षात जवळपास 75 हजार मेट्रीक टन गहू अफगाणिस्तानला दिला होता. पाकिस्तानच्या या निर्णयाने भारताचा फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे कौतुक होईल. तर दुसरीकडे संकटाच्या काळात अफगाणिस्तानला मदत मिळणार आहे.

Advertisement

याआधी काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला होता. त्यामुळे पाकिस्तानने धान्य वाहतुकीचा रस्ता बंद केला होता.

Advertisement

भारत देणार अफगाणिस्तानला 50 हजार मेट्रिक टन गहू.. याबाबत काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान

Advertisement
Advertisement

Leave a Reply