Take a fresh look at your lifestyle.

अर्र… आता ‘त्या’ राज्यांमध्ये घडलाय वेगळाच प्रकार; केंद्र सरकारचेही वाढलेय टेन्शन; पहा, नेमके काय घडलेय..?

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे लोकांचा बेजबाबदारपणा वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष, मास्क वापरायचा नाही असे सर्रास प्रकार घडत आहेत. तर दुसरीकडे सरकारी पातळीवरही निष्काळजीपणा वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र, कोरोना चाचण्यांची संख्या कमी होत असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शानास आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील 13 राज्यांना सतर्क केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी या राज्यांना पत्र पाठवले आहे.

Advertisement

कोरोना चाचण्या कमी होत गेल्या तर कोरोना संक्रमणाचा धोका ओळखता येणार नाही. त्यामुळे या राज्यांनी आरटी-पीसीआर चाचण्यांच्या संख्येत वाढ करावी, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे. ज्या राज्यांना पत्र पाठवले आहे, त्यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान, लद्दाख, मिजोरम, मेघालय, मणिपूर, केरळ, गोवा, सिक्कीम, महाराष्ट्र आणि आणखी एक राज्याचा समावेश आहे.

Advertisement

या राज्यांमध्ये समारंभा वेळी लोकांची गर्दी वाढत असल्याचे उदाहरण देण्यात आले आहे. आवश्यक प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या नाहीत तर कोरोना संक्रमण किती आहे, याचा योग्य अंदाज घेता येणार नाही. त्यामुळे भविष्यात परिस्थिती अत्यंत धोकादायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना चाचण्या आवश्यक प्रमाणात केल्या तर कोरोना संक्रमण नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.

Advertisement

ज्या राज्यांना पत्र पाठवले आहे त्यापैकी काही राज्यांतील जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमण वाढत असल्याचे संकेत मिळाले आहेत. केरळ राज्यात सध्या कोरोना चाचण्यांची संख्या मे महिन्याच्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षाही कमी राहिली आहे. मात्र, कोरोना संक्रमण दर 9.7 टक्के आहे. या राज्यांत कोरोना चाचण्यांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

Advertisement

राज्यांचा थोडासा निष्काळजीपणा सुद्धा घातक ठरू शकतो. अमेरिका आणि युरोपातील देशात लसीकरण केल्यानंतरही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. राज्यांनी कोणत्याही परिस्थितीत सतर्क राहणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

Advertisement

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार..? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय ‘हा’ इशारा

Advertisement

.. अन् तरीही ‘त्या’ देशांना कोरोना रोखता येईना; पहा, युरोपीय देशांत कशामुळे वाढतोय कोरोना

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply